विजय वर्माला नक्की कोणता आजार झालाय
मिर्झापूर, गली बॉईज, डार्लिंग यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा पारा वाढवणारा अभिनेता विजय वर्माला आज परिचयाची गरज नाही. त्याने अनेक भूमिका केल्या आहेत आणि बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटियालादेखील तो सध्या डेट करत आहे, ज्यामुळे तो सतत चर्चेत असतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का की विजय वर्मा त्वचेच्या दुर्मिळ समस्येने त्रस्त आहे, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतात आणि ते लपवण्यासाठी मेकअपचा वापर करावा लागतो.
विजय वर्मा यांच्या या आजाराविषयी आपण आज अधिक माहिती घेऊया. या आजाराला नक्की काय म्हणतात आणि या आजाराची लक्षणे काय आहेत याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
विजय वर्माला झालाय कोणता आजार?
अलीकडेच एका वेब सीरिजच्या प्रमोशन दरम्यान, विजय वर्माने खुलासा केला की तो त्वचारोगाने ग्रस्त आहे ज्याचे नाव विटिलिगो आहे, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतात आणि ते लपवण्यासाठी त्याला मेकअपचा आधार घ्यावा लागतो. विटिलिगो हा इंग्रजी शब्द असला तरीही याला मराठीत कोड असंही म्हटलं जातं वा या नावाने ओळखलं जातं.
विटिलिगो त्वचारोग म्हणजेच पांढऱ्या डागांची समस्या आणि हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात रंगद्रव्य निर्माण होऊन त्वचेचा मूळ रंग हरवतो आणि पांढरे ठिपके तयार होऊ लागतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विटिलिगोमध्ये शरीरातील मेलेनिनचे उत्पादन कमी करणाऱ्या पेशी हळूहळू मरायला लागतात, त्यामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसतात
Paracetamol: थांबा! या लोकांसाठी पॅरासिटामॉल ठरू शकते घातक, अभ्यासात मोठा खुलासा
विटिलिगोची लक्षणे
विटिलिगो न होण्यासाठी घ्यायची काळजी
विटिलिगो त्वचारोगावर अद्याप कोणताही अचूक उपचार नाही, जे काही उपचार अस्तित्वात आहेत ते फक्त त्याचा प्रसार थांबवतात. विटिलिगोची सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यावर औषधे आणि क्रीम्सद्वारे तो बरा करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी लेझर थेरपीचाही वापर केला जातो.
याशिवाय, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हा प्रसार पूर्णपणे थांबतो, तेव्हा नॅरो बँड थेरपी देखील दिली जाऊ शकते. याशिवाय एक्सायमर लेसरमधील यूव्हीबी प्रकाशाच्या माध्यमातून त्वचेतील मेलेनिनचे उत्पादन वाढवून मूळ रंग परत आणता येतो, त्यामुळे पांढरे डाग पसरण्यास प्रतिबंध करता येतो
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.