जाणून घ्या चेहरा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
राज्यभरात सगळीकडे उन्हाचा कडाका वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे आरोग्यासह त्वचेचे देखील नुकसान होते. या दिवसांमध्ये उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा घरी असताना चेहरा तेलकट आणि चिकट होऊन जातो. सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे उन्हाळा सुरु झाल्यानंतर योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करून त्वचेची जास्त काळजी घ्यावी. उन्हात बाहेर जाताना स्कर्फ आणि सनस्क्रीन लावणे अतिशय महत्वाचे आहे. अन्यथा त्वचा काळवंडलेली दिसू लागते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही प्रयत्न करत असतात. मात्र तरीसुद्धा त्वचा तेलकट आणि चिकटच दिसते.(फोटो सौजन्य – iStock)
धावपळीच्या जीवनशैलीतून वेळ काढत त्वचा आणि केसांची योग्य काळजी घ्यावी. चेहरा तेलकट किंवा चिकट झाल्यानंतर तो योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे पिंपल्स, मुरूम किंवा त्वचेसंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे फेशवॉशचा वापर करून चेहरा स्वच्छ करावा. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची कशी काळजी घ्यावी? दिवसभरातून चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होईल.
त्वचेची काळजी घेताना महिला दिवसभरातून चार किंवा पाच वेळा चेहरा फेसवॉशचा वापर करून स्वच्छ करतात. मात्र सतत फेसवॉश वापरल्यामुळे त्वचेमधील ओलावा कमी होऊन त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडल्यानंतर कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा येत नाही. त्यामुळे दिवसभरात दोन वेळाच फेसवॉशचा वापर करून चेहरा स्वच्छ करावा. चेहरा सकाळी आणि रात्रीच्या वेळा स्वच्छ करावा. यामुळे त्वचेवर साचून राहिलेली धूळ, माती निघून त्वचा स्वच्छ होते.
तेलकट, पिंपल्स आणि मुरुमानी भरलेली त्वचा दिवसभरातून दोनदाच स्वच्छ पाण्याने धुवावी. यामुळे त्वचेवरील धूळ, माती निघून जाण्यास मदत होईल. दिवसभरातून दोन चेहरा धुतल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरूम कमी होतात. याशिवाय तुम्ही उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा घामामुळे कंटाळा असाल तर दिवसभरातून तीन किंवा चार वेळा त्वचा स्वच्छ करावी.
कोरड्या त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा अतिशय कमी असतो. त्यामुळे दिवसभरातून त्वचा दोनदा न धुवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करू शकता आणि रात्रीच्या वेळी फेसवॉश वापरून चेहरा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेमधील घाण, धूळ, माती कमी होईल आणि पिंपल्स किंवा ऍक्ने येणार नाहीत.