सकाळी उठल्यानंतर चमचाभर पिठाचा वापर करून त्वचा करा स्वच्छ
सकाळी उठल्यानंतर काहींची त्वचा खूप जास्त कोरडी पडते तर काहींची त्वचा खूप जास्त तेलकट होऊन जाते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला सतत काहींना काही उपाय करतात. कधी स्किन केअरमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ब्राइटनिंग क्रीम किंवा लोशनचा वापर केला जातो. पण वारंवार संवेदनशील त्वचेवर केमिकल युक्त प्रॉडक्ट लावल्यास त्वचा खूप जास्त खराब होऊन जाते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, ऍक्ने, मुरूम आणि फोड कमी करण्यासाठी स्किन ट्रीटमेंट किंवा केमिकल पिल केले जाते. यामुळे काहीकाळ चेहऱ्यावर अतिशय सुंदर ग्लो येतो आणि कालांतराने पुन्हा एकदा त्वचेच्या समस्या वाढू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
संपूर्ण शरीराच्या कार्यात आणि छोट्या मोठ्या अवयवांमध्ये बिघाड झाल्यानंतर चेहऱ्यावर फोड येतात. काहीवेळा फोड नाकावर येतात, तर काहीवेळ कपाळ, गाल इत्यादी भागावर येतात. त्यामुळे चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या फोडांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणत्या पिठाचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आठवडाभर नियमित वापर केल्यास त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसून येतील. केमिकल्स त्वचेला कोरडी, निस्तेज आणि संवेदनशील करून टाकतात.त्यामुळे नैसर्गिक पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी बेसन पीठ अतिशय प्रभावी ठरते.
पूर्वीच्या काळी त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्याही महागड्या फेसवॉश किंवा फेसक्रीमचा वापर न करता बेसन पिठाचा वापर केला जायचा. चण्याच्या डाळीचे पीठ दळून ते त्वचेवर लावले जायचे. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, काळे डाग आणि त्वचेच्या सर्वच समस्या कमी होतात. सकाळी उठल्यानंतर त्वचा दिवसभर फ्रेश ठेवण्यासाठी बेसन पिठाचा वापर करावा. बेसन पिठात असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचेला आतून पोषण देतात आणि त्वचा सुंदर करतात.
नाक आणि ओठांच्यामध्ये असलेल्या अवयवाला काय म्हणतात? याचा नेमका उपयोग काय ?
सकाळी उठल्यानंतर बेसन पिठाचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी. यासाठी वाटीमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात थोडे पाणी, गुलाबपाणी किंवा कच्चे दूध मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये हळद किंवा दही सुद्धा मिक्स करू शकता. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने संपूर्ण त्वचेवर लावा आणि मसाज करा. यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल आणि त्वचा अधिक सुंदर दिसेल. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास त्वचा खूप सुंदर आणि डागविरहित होईल.






