वयाच्या चाळीशीनंतर वाढतो हार्ट अटॅकचा धोका! आजच सोडून द्या दैनंदिन जीवनातील 'या' वाईट सवयी, अन्यथा उद्भवतील गंभीर समस्या
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची कारणे?
तरुणांमध्ये हार्ट अटॅकचा धोका का वाढला आहे?
हार्ट अटॅकच्या आधी दिसून येणारी लक्षणे?
जगभरात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तरुण वयातील मुलामुलींना कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊ शकतो. पूर्वीच्या काळी वयाच्या ६० व्या वर्षानंतर होणारे आजार तरुण वयात होऊ लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तरुण वयातील मुलामुलींनी शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीराला खूप जास्त हानी पोहचण्याची शक्यता असते. जीवनशैलीत केलेल्या छोट्या मोठ्या चुकांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. पण शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.(फोटो सौजन्य – istock)
म्हतारपणी होणारे आजार तरुण वयात होत आहे. निरोगी आणि फिट दिसणाऱ्या तरुणांना हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. हार्ट अटॅक हा अनुवांशिक आजार नसून जीवनशैलीतील चुकीच्या सवयींमुळे होणारा गंभीर आजार आहे. हार्ट अटॅक येण्याच्या २ ते ३ महिने आधीपासून शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. असे न करता वेळीच उपचार केल्यास शरीरसंबंधित आजारांचा धोका टाळता येईल. जीवनशैलीतील या वाईट सवयींपासून कायमच लांब राहणे आवश्यक आहे. अन्यथा हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
सकाळी उठल्यानंतर कामाच्या धावपळीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे सकाळचा नाश्ता केला जातो. काहीवेळा नाश्ता बनवण्याचा खूप जास्त कंटाळा केला जातो. पण असे न करता सकाळी उठल्यानंतर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. उपाशी पोटी राहिल्यामुळे शरीराला गंभीर आजाराची लागण होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय नाश्ता केल्यामुळे मानसिक तणाव वाढत नाही आणि कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यात पराठा, पोळी, ओट्स किंवा उकडलेले अंडे इत्यादी पदार्थ खाऊ शकता.
तासनतास एका जागेवर बसून काम करत राहिल्यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढतो. शरीरात वाढलेल्या चरबीमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. खुर्चीवर बसून राहणे, घरी आल्यानंतर बेडवर झोपून राहणे इत्यादी चुकीच्या सवयींमुळे हृदयाला धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली करणे फार आवश्यक आहे. यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीरात जमा झालेली अनावश्यक चरबी जाळून जाण्यास मदत होते.
कामाच्या धावपळीमध्ये सकाळच्या वेळी नाश्ता करण्याचा सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. प्रोसेस्ड फूड खाण्याचा ट्रेंड वाढल्यामुळे तरुणाई चुकीच्या गोष्टींच्या आहारी जात आहे. सतत ऑनलाईन ऑर्डर करून अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचते. या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते.
Ans: वयानुसार शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि तणाव यांसारख्या समस्या वाढतात. त्यामुळे चाळीशीनंतर हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढू शकतो.
Ans: धूम्रपान, मद्यपान, जंक फूडचे जास्त सेवन, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप आणि सततचा ताण या सवयी हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात.
Ans: छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे, डाव्या हातात किंवा जबड्यात वेदना जाणवणे, चक्कर येणे अशी लक्षणे हार्ट अटॅकपूर्वी दिसू शकतात.






