प्राडाने लॉंच केलेल्या सेफ्टी पिनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!
दैनंदिन वापरात अनेक लहान मोठ्या वस्तूंचा वापर केला जातो. स्वयंपाक घरातील भांड्यांपासून ते लहान मोठ्या पिन इत्यादी सर्वच कायमच आवश्यक असतात. त्यातील महिलांच्या कपाटात नेहमीच आढळून येणारी वस्तू म्हणजे सेफ्टी पिन. साडी नेसताना सेफ्टी पिनचा वापर केला जातो. साडीच्या पदराला किंवा निऱ्यांना पिन लावल्याशिवाय साडी व्यवस्थित राहत नाही. फॅशनच्या युगात अनेक नवनवीन वस्तू नव्या रूपात बाजारात येत आहेत. अशीच एक वस्तू म्हणजे प्राडाने लॉंच केलेला सेफ्टी पिन. इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडा त्यांच्या युनिक फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. नुकताच त्यांनी ५ क्रोशे सेफ्टी पिन ब्रोच बाजारात आणली आहे. या ब्रोचची किंमत ६९ हजार रुपये आहे. या सेफ्टी पिनची किंमत ऐकून सगळ्यांचं धक्का बसला आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
बाजारात ५ रुपयांना मिळणार सेफ्टी पिन प्राडा ६९ हजारांना विकत आहे. प्राडाचा सेफ्टी पिन ब्रोच तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे: हलका निळा, गुलाबी आणि नारंगी असून त्यांची किंमत $७७५. रंगीत क्रोशे कॉर्ड डिटेलसह, पिन पितळापासून बनवण्यात आला आहे. तसेच सिग्नेचर लोगो म्हणून त्रिकोणी आकर्षणाने सजवण्यात आला आहे. प्राडाने लॉंच केलेल्या सेफ्टीवर नेटकाऱ्यानी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत. “माझ्या घरात असलेल्या वस्तूंनी मी हे बनवू शकतो! खूपच स्वस्तात, “मला वाटतंय की हे सर्वत्र विणकाम करणाऱ्या आणि क्रोशे करणाऱ्यांचा अपमान आहे कारण काय???” “मला वाटले की कदाचित पिन सोन्याची असेल…ते हे स्पष्ट करू शकेल. नाही, ते पितळ आहे. हे अवास्तव आहे, असे म्हणत वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
जगभरात प्राडा हा ब्रँड चर्चा विषय बनवला आहे. प्राडाची स्थापना १९१३ मध्ये मिलानमध्ये मारियो प्राडाने केली होती आणि ती मूळतः प्राडा ब्रदर्स म्हणून ओळखली जात होती. १९७८ मध्ये, मारियोची नात मियुसिया प्राडाने कंपनीच्या विशिष्ट कपड्यांमध्ये विस्ताराचे नेतृत्व केले जे जगभरातील सेलिब्रिटींमध्ये आवडते बनले. त्यानंतर त्यांनी लॉंच केलेल्या प्रत्येक वस्तूला बाजारात मोठी मागणी आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी प्राडाने ट्रेनच्या फरशीचा बॅग, भारतीय डिझाईनची कोल्हापुरी चप्पल फॅशन वीक मध्ये आणली होती. यामुळे अनोखा वाद रंगला होता.
Prada ने लाँच केली लोकल ट्रेनच्या फरशीची बॅग! सोशल मीडियावर उडवली …
लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाने लॉंच केलेल्या सेफ्टी पिनचे रूपांतर एका फॅशन ऍक्सेसिरींजमध्ये करण्यात आले आहे. निटेड-थ्रेडचा वापर करून त्यावर डिझाईन तयार करण्यात आली आहे. तसेच पिनला एक आकर्षक त्रिकोणी रंगाचा लोगो सुद्धा लावण्यात आला आहे. हिंदुस्थानी चलनानुसार, 69 हजार रुपयांना पिन उपलब्ध आहे. प्राडा लक्झरी ब्रँड्स वस्तूंच्या डिझाइन आणि नावाच्या बळावर अनेक महागड्या वस्तू बाजारात विकत असल्याचे चित्र दिसून आले आहे. प्राडाच्या सर्वच वस्तूंची किंमत अतिशय महाग आहे.






