'कोल्हापुरी चप्पल' ने घेतली प्रादाच्या नवीन कलेक्शनमध्ये एंट्री!
जगभरात कोल्हापुरी चप्पल अतिशय फेमस आहे. नऊवारी किंवा इतर सर्वच कपड्यांवर कोल्हापुरी चप्पल खूपच सुंदर आणि उठावदार दिसते. मात्र यावेळी ही चप्पल जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. मिलानमध्ये झालेल्या प्रादा स्प्रिंग समर 2026 च्या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पल प्रमाणे डिझाईन केलेले सँडल परिधान केले होते. या चप्पलांची जगभरात वेगळीच चर्चा रंगली आहे. आंतरराष्ट्रीय रॅम्पवर प्राडा मॉडेल्सच्या पायात कोल्हापुरी चप्पला दिसून आल्या. कोल्हापुरी स्टाईलने तयार करण्यात आलेल्या चप्पलांना कंपनीकडून कोणतेच श्रेय देण्यात आले नाही. यामुळे एक अनोखा वाद रंगला आहे. कोल्हापूरच्या देसी कारागिरांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
उत्तराखंडमधील या ठिकाणाला म्हटले जाते भारतातील पहिले गाव, फक्त इथेच घडते सरस्वती नदीचे दर्शन
आंतरराष्ट्रीय रॅम्पवर प्राडा मॉडेल्सच्या पायात कोल्हापुरी चप्पल होत्या. या चप्पला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफ अदाजानिया यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली. यामध्ये असे लिहिण्यात आले आहे की, ही आमची जुनी कोल्हापुरी चप्पल आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड भारताला श्रेय देण्यास कधी सुरुवात करतील? असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.कोल्हापूरच्या पारंपरिक चपला युरोपमध्ये फॅशन म्हणून £१००० एवढ्या किमतीने विकल्या जाणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्र आणि कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पल या पारंपरिक हस्तकलेतून तयार करण्यात आल्या आहेत.ज्याचा इतिहास 13 व्या शतकापासून आहे. हाताने विणकाम करून तयार केलेल्या चप्पला अतिशय आरामदायी आणि आरोग्यासाठी गुणकारी आहेत. कोल्हापुरी चपला प्रामुख्याने चामड्यापासून बनवल्या जातात. या चपलांचे वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापुरी चप्पल नैसर्गिक तपकिरी रंगाच्या असतात. या चपला तयार करण्यासाठी महिनाभराचा वेळ लागतो. हस्तकलेचे एक अद्वितीय उदाहरण असल्याने, याला GI टॅग देखील देण्यात आला आहे.
5000 वर्षे जुनं ठिकाण, जिथे पांडवांनी केला होता निवास! भीमकुंडात स्नान करताच दूर होतात सर्व आजार
12 व्या शतकात कोल्हापुरी चपला तयार करण्यात आल्या होत्या. या चपला केवळ पादत्राण नसून, पारंपरिक कौशल्य, स्थानिक जीवनशैली आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक म्हणून जगभरात सगळीकडे ओळखल्या जातात. तसेच या चपलांचा इतिहास सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अठरापगड जातींच्या कारागिरांपासून ते आत्तापर्यंत कोल्हापुरी चप्पल हाताने तयार केली जात आहे.