हल्ली तरुण दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीला पर्याय म्हणून फेस लिफ्टिंगची प्रक्रिया केली जाते. फेस लिफ्टिंग केल्याने तुमचे वय वाढत असले तरी तुमच्या चेहेऱ्याचे वय वाढत नाही. तुमच्या चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य तसेच टिकून राहते. या टेक्नॉलॉजीने सर्जरी न करता तुमचेच टिश्यू वापरून तुमच्या चेहऱ्यावर नवी चमक आणता येते. ही एक नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये तुमच्या चेहेऱ्याच्या बनावटीत बदल केला जातो. तसेच तुमच्या त्वचेवर असलेले वाढत्या वयाचे सगळे मार्क्स काढून टाकले जातात आणि त्वचेवर ज्या ठिकाणी वॉल्यूम कमी असेल तिथे ते वाढवले जाते.
वयाच्या विशीनंतर ते साठ वर्षाच्या वयापर्यंत कोणीही फेस लिफ्टिंग करू शकतात. यामध्ये सर्वात आधी तुमच्या चेहेऱ्याचे मूल्यांकन केले जाते आणि तीन प्रकारच्या भागांना चिन्हीत केले जाते. जसे की, जिथे त्वचेचे वॉल्यूम वाढवायचे आहे असा भाग, जिथे त्वचेचे वॉल्यूम कमी करायचे आहे असा भाग आणि जिथे वॉल्यूम तर समतोल आहे पण त्वचा तरुण बनवायची आहे असा भाग होय.
तरुण दिसण्यासाठी सगळेच जण धडपडत असतात. पण सर्वांनाच प्लास्टिक सर्जरीचा खर्च परवडण्यासारखा नसतो. पण सध्या मार्केटमध्ये प्लास्टिक सर्जरीला पर्याय म्हणून फेस लिफ्टिंगची प्रक्रिया करण्याचा ट्रेंड सुरू आहे. फेसलिफ्टिंगची प्रक्रिया वयाची विशी ओलांडल्यानंतर ते वयाच्या साठीपर्यंत कोणतीही व्यक्ती करू शकते. ही प्रक्रिया करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या चेहेऱ्याचे मूल्यांकन केले जाते. चेहेऱ्याच्या कोणत्या भागात वॉल्यूम वाढवायचे, कोणत्या भागात कमी करायचे आणि कोणत्या भागांमध्ये प्रौढ किंवा वृद्धपणाची लक्षणे कायमची काढून टाकायची ते ठरवले जाते.
फेस लिफ्ट करण्यासाठी सर्वात आधी चांगल्या क्वालिटीचा प्लेटलेट्स रिच प्लाझ्मा मिळवला जातो. त्यानंतर ज्याचे फेस लिफ्टिंग करायचे आहे त्यांचे रक्त घेतले जाते. त्यानंतर एक प्रक्रिया करून पीआरपीला आयसोलेट केले जाते. मग एक विशेष टेक्निक त्या प्लेटलेट्सना वाढवण्याचे काम करते.
याची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे तुमचे शरीर आणखी जास्त टिश्यू निर्माण करण्यासाठी तयार असते. हे काम फक्त एक्स्पर्ट करू शकतात. या प्रक्रियेसाठी पन्नास ते ऐशी हजार रुपये इतका खर्च येतो.