(फोटो सौजन्य: istock)
चुकीची जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे कमी वयातच आरोग्याच्या समस्या जाणवत असतात, वेळीच लक्ष न दिल्यास आपल्या अंतर्गत शरीरात अनेक बदल घडून येतात जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात. शरीराचा प्रत्येक अंग हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यातीलच एक म्हणजे आपले यकृत. आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी यकृत ५०० हून अधिक महत्वाच्या कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. अशा परिस्थितीत याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. परंतू आपल्या काही चुकीच्या सवयी यकृताशी संबंधित समस्या वाढवत असतात.
आम्ही तुम्हाला सांगतो की दरवर्षी जगभरात मोठ्या संख्येने लोकांना यकृताच्या आजाराचे निदान होते. परंतु यकृताशी संबंधित अनेक आजार आहेत जे तुम्ही तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात आवश्यक बदल करून टाळू शकता. यकृत निरोगी ठेवण्यासाठी, निरोगी पदार्थ निवडणे जितके महत्वाचे आहे तितकेच काही अनहेल्दी पदार्थ टाळणे देखील महत्वाचे आहे. सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अशा तीन पदार्थांबद्दल माहिती दिली आहे जे यकृताच्या आरोग्यास घातक ठरत असतात आणि त्यांचे वेळीच सेवन टाळणे फार महत्त्वाचे आहे.
फ्रक्टोज समृध्द पदार्थ
फ्रुक्टोज सामान्यतः साखरयुक्त पेय आणि प्रक्रिया केलेल्या स्नॅक्समध्ये आढळून येते. हे पदार्थ पूर्णपणे आपल्या यकृताला नियंत्रित करत असतात. अशा पदार्थांचे सेवन कालांतराने शरीरात चरबी जमा करते, ज्यामुळे फॅटी लिव्हर रोगाचा धोका वाढू शकतो.
इंडस्ट्रीज सीड ऑयल
याशिवाय, डॉक्टरांनी सोयाबीन, कॉर्न आणि सूर्यफूल यांसारख्या औद्योगिक बियाण्यांचे तेल टाळण्याचाही सल्ला दिला आहे. यामध्ये ओमेगा ६ फॅटचे प्रमाण जास्त असते. ओमेगा ६ फॅटचे जास्त प्रमाणात सेवन करणे, शरीरात जळजळ निर्माण करते आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला वाढवू शकतो, जे दोन्ही यकृतासाठी हानिकारक ठरते.
फणस खाल्यानंतर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! लघवीमधील जळजळ वाढून आतड्यांवर येईल ताण
फ्रूट जूस
अनेक पार्टीज आणि महत्त्वाच्या प्रसंगी फ्रुट ज्यूस सर्व्ह केले जाते मात्र तुम्हाला माहिती आहे का? अनेकदा पिले जाणारे हे फ्रुट ज्यूस देखील आपल्या यकृताच्या आरोग्यसाठी धोकादायक ठरत असते. अगदी नॅचरल १०० टक्के ड्रिंक्समध्येही फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते आणि त्यात फायबर नसते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते, ज्यामुळे यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.