(फोटो सौजन्य – istock)
चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि आहारामुळे आजकल प्रत्येकजण लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जात आहे. लठ्ठपणा हा एक आजार असून यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. लठ्ठ लोकांना त्यांच्या अतिवजनामुळे रोजच्या जीवनातील कामे करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लोक आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न तर करतात मात्र बऱ्याचदा याचे परिणाम दिसून येत नाही.
वजन वाढणे किंवा कमी करणे हे तुमच्या सवयींशी देखील संबंधित आहे. काही सवयी अशा आहेत ज्या तुम्हाला लठ्ठपणाकडे घेऊन जातात. अशा लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे वजन कमी होत नाही. बऱ्याचदा लोकांना हेही माहित नसते की त्यांच्या या सवयी लठ्ठपणाचे खरे कारण आहेत. आज आम्ही या लेखात अशाच काही सवयींविषयी माहिती सांगणार आहोत, ज्या हळूहळू शरीरात लठ्ठपणा वाढवू लागतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आजच तुम्ही या सवयी टाळणे गरजेचे आहे. जलद गतीने वजन कमी करण्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेऊया.
जंक फूडचे सेवन टाळा
जर तुम्ही जास्त जंक फूड खाल्ले तर लठ्ठपणा वेगाने वाढू लागतो. मैदा, पॅक्ड फूड आणि फ्रोजन फूड हे लठ्ठपणा वाढवण्याचे प्रमुख कारण आहेत. हे फूड शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाला जन्म देते. यात फॅटचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. जर तुम्ही चिप्स, बर्गर, पिझ्झा किंवा बाहेरचे अन्न खात असाल तर ही सवय पूर्णपणे सोडून द्या. तुम्ही हे जंक फूड खाणे टाळले तर तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागेल.
रात्री उशिरा जेवण्याची सवय चांगली नाही
काही लोक रात्री उशिरा जेवतात. उशिरा जेवल्याने अन्न व्यवस्थित पचत नाही आणि त्याचे चरबीत रूपांतर होते. वजन वाढण्यास कारणीभूत असलेली एक सवय म्हणजे रात्री उशिरा जेवणे. जर तुम्हालाही उशिरा जेवण्याची सवय असेल तर ही सवय वेळीच बदला. संध्याकाळी ७ नंतर खाणे बंद करा. तुमचे वजन आपोआप कमी होण्यास सुरुवात होईल.
उन्हाळ्याच्या आगमनाने घरात गोमचा धोका वाढलाय, या 4 मार्गांनी त्यांना दाखवा बाहेरचा रास्ता
व्यायाम न करणे
जे लोक दिवसभर कोणताही व्यायाम करत नाहीत. जे कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करत नाहीत त्यांचे वजन निश्चितच वाढू लागते. अशा लोकांमध्ये लठ्ठपणा जलद गतीने वाढतो. वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. झपाट्याने वजन कमी करायचे असेल तर डाएट करण्यासोबतच नियमितपणे रोज व्यायामालाही महत्त्व द्या.
गोड आणि तळलेल्या अन्नपदार्थांचे सेवन
गोड पदार्थ चवीला उत्तम लागत असले तरी यामुळे तुमचा लठ्ठपणा आणखीन वाढ शकतो. जर तुम्ही जास्त गोड पदार्थ खाल्ले किंवा तळलेले अन्नपदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले तर यामुळे तुमचे वजन अनेक पटींनी वाढू शकते. जर तुम्ही बाजारात मिळणारे पॅक केलेले ज्यूस, कोल्ड्रिंक्स किंवा चिप्स यांचे सेवन करत असाल आजच सेवन टाळा. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यानेही लठ्ठपणा वाढतो. म्हणून, या दोन्ही गोष्टींपासून दूर राहा. असे केल्याने निश्चितच तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
जेवल्यानंतर लगेच झोपणे
काही लोक जेवल्यानंतर लगेच झोपी जातात. जी वजन वाढवण्याची सवय आहे. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने लठ्ठपणा वाढतो. जर तुम्हालाही रोज उशिरा झोपण्याची सवय असेल तर ती सवय वेळीच टाळा. जेवल्यानंतर किमान १५-२० मिनिटे चाला. जेवण आणि झोप यात कमीत कमी २-३ तासांचे अंतर असले पाहिजे. यामुळे वजन वाढत नाहीत आणि वजन कमी करण्यास मदतही होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.