कोरोनाव्हायरसने आपल्या जीवनावर अनेक परिणाम केले आहे. कोविड-१९ च्या वेळेवर आपण लसी आणि वैधकीय उपचार घेतले. आपल्या कडे चांगल्या लसी आणि चांगल्या वैधकीय सुविधा जरी उपलब्ध असल्या तरी अनेक लक्षणे दिसून येत आहे. घास खवखवणे, सौम्य ताप, शरीरदुखी किंवा थकवा या सारखे अनेक सौम्य लक्षणे दिसून येत आहे. अश्या परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही आहे, पण सतर्क राहण्याची गरज आहे. जर लक्षणे सौम्य असतील तर औषधांऐवजी घरगुती उपचार तुम्हाला मदत करू शकतात. चला जाणून घेऊया
नवतपाची होणार “या” दिवसापासून सुरवात; हे टिप्स करा फॉलो
घरी ठेवलेल्या गोष्टींमुळे तुम्ही केवळ कोविडची सुरुवातीची लक्षणेच बरी करू शकत नाही तर तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत करू शकता. तुमच्या शरीराला आराम देणाऱ्या आणि तुमचे आरोग्य सुधारणाऱ्या अशा ७ सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया.
हळदीचे दूध
रात्री झोपण्यापूर्वी एक कप कोमट दूध हळद घालून पिणे संसर्गाशी लढण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हळदीमध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर असतात, ज्यामुळे घसा खवखवणे आणि शरीराच्या वेदनांपासून आराम मिळतो.
मध आणि आल्याचे मिश्रण
अर्धा चमचा आल्याचा रस एक चमचा शुद्ध मधात मिसळा आणि दिवसातून दोनदा घ्या. हे मिश्रण कफ आणि खोकला कमी करण्यासाठी प्रभावी आहे आणि घशातील खवखव कमी करण्यास मदत करते.
वाफ घेणे
दिवसातून दोनदा स्टीम घेतल्याने बंद नाक, घशाची सूज आणि डोकेदुखी कमी होते. याशिवाय तुमचे सायनस आणि श्वसनमार्ग स्वच्छ करते.
लिंबू आणि गरम पाणी
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध मिसळून कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. या उपायामुळे घशातील खवखव दूर होते.
लसूण सेवन
लसूण ज्यामध्ये बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्याची क्षमता असते. सकाळी रिकाम्या पोटी एक किंवा दोन कच्च्या लसूण पाकळ्या चावणे फायदेशीर आहे.
तुळस-मिरीची काढणी
तुळस आणि काळी मिरीपासून बनवलेला काढा कोविडच्या सौम्य लक्षणांमध्ये खूप आराम देतो. ते घसा साफ करते, ताप कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
कोविड आता तितका गंभीर नसेल, पण तरीही दक्षता आवश्यक आहे. हे काही घरगुती उपाय केवळ लक्षणे कमी करण्यास मदत करत नाहीत तर तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील सुधारतात.