संधिवातापासून सुटका मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील 'हे' पदार्थ
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमधील बदल, अपुरी झोप, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. या चुकीच्या सवयींमुळे शरीरात युरिक अॅसिड वाढण्याची शक्यता असते. शरीरात एकदा युरिक अॅसिडची पातळी वाढली की ती नियंत्रणात आणणे खूप कठीण जाते. युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर सांध्यामध्ये वेदना, सूज आणि उठण्याबसण्यास त्रास होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या सर्व समस्या जाणवू लागल्यानंतर यांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
युरिक अॅसिड हा आजार नसून प्युरीन नावाचा पदार्थ तयार होतो. तसेच शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर युरिक अॅसिडचे प्रमाण शरीरात वाढते. शरीरात विषारी पदार्थमध्ये वाढ झाल्यानंतर ते बाहेर काढून टाकण्याचे काम युरिक अॅसिड करते. पण विषारी पदार्थ बाहेर पडले नाहीतर त्याचे रूपांतर युरिक अॅसिडच्या स्वरूपात होऊन सांध्यामध्ये क्रिस्टल्स साचू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला युरिक अॅसिड आणि संधिवाताच्या समस्यासेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थाचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ युरिक अॅसिड कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: आपल्या लिव्हरमध्ये फॅट जमा होत आहे, हे ‘या’ लक्षणांमुळे समजते
संधिवातापासून सुटका मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील ‘हे’ पदार्थ
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बदाम खायला खूप आवडतात. अनेकदा घरात सगळ्यांना भिजवलेले बदाम खाण्यास दिले जाते. कारण बदाम खाल्ल्यामुळे मेंदूची ताकद वाढून स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच बदाम खाल्यामुळे शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होत जाते. बदामामध्ये प्युरीनचे प्रमाण कमी असते आणि विटामिन ई, मॅग्नेशियम आणि मँगनीज मोठ्या प्रमाणावर आढळून येते. बदामामध्ये असलेले पोटॅशियम युरिक अॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
हे देखील वाचा: शरीराच्या नसानसात भरेल ताकद,रोजच्या आहारात करा ‘या’ ड्रायफ्रुटचा समावेश
संधिवातापासून सुटका मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील ‘हे’ पदार्थ
गोड किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी काजूचा वापर केला जातो. काजू खाल्यानंतर लगेच पोट भरते. पोषक तत्वांनी समृद्ध असलेले काजू आरोग्यसाठी अतिशय गुणकारी आहेत. तसेच काजूमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. काजूप्रमाणेच अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आढळून येते. ज्यामुळे शरीरात युरिक अॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होते.