जन्माष्टमीला बाल गोपाळांची मनोभावी पूजा केली जाते, पण ही पूजा करतांना पूजेमध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण शास्रानुसार या गोष्टींशिवाय कृष्णपूजा ही अपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्त्व आहे. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी १८ ऑगस्ट २०२२ रोजी गुरुवारी आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्रात झाला, त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. या दिवशी जे भक्त पूर्ण भक्तिभावाने कृष्णाची आराधना करतात, त्यांच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात, असे मानले जाते.
बासरी ही श्रीकृष्णाची सर्वात आवडती वस्तू आहे. त्यामुळे पूजेत बासरी ठेवा. कृष्णाची बासरी ही साधेपणा आणि निरागसतेच प्रतीक आहे. पूजा करतांना श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत गायीची देखील मूर्ती ठेवावी. कारण हिंदू धर्मात गाय ही अत्यंत पूजनीय मानली जाते. गायीच्या पोटात ३३ कोटी देव-देवता वास करतात असे मानले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या प्रसादात तुळशीचे पानं नसेल तर भोग दिला जात नाही. त्यामुळे प्रसादामध्ये तुळशीचे पानं अवश्य टाकावे.मोराच्या पिसाशिवाय भगवान श्रीकृष्णाची सजावट अपूर्ण राहते, म्हणून कृष्णाच्या मूर्तीसोबत मोराची पिसे ठेवावी. मोराचे पंख हे सप्तरंगाचे आणि भव्यतेचे प्रतीक आहे. माखन मिश्री कृष्णाला खूप आवडते आहेत. म्हणून आठवणीने जन्माष्टमीला माखन मिश्रीला लाडू गोपाळांना अर्पण करावा.
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण लहान मुलाच्या रूपात प्रकट होतात आणि त्यांना झुलायला पाळणा लागतो .त्यामुळे पूजेत पाळणा ठेवा, यामुळे तुमच्या कुटुंबात देखील आनंद येऊ शकतो. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला वैजयंतीला विशेष हार घालतात. त्यामुळे पूजेच्या वेळी श्रीकृष्णाला वैजयंती हार घालायला विसरू नका. हा श्रीकृष्णाला घातलेला वैजयंती हार घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी घरात राधा-कृष्णाचे चित्र किंवा फोटो लावावा. असे केल्याने पती पत्नीचे प्रेमसंबंध चांगले होतात. जन्माष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये शंख ठेवावा, यामुळे धनाची प्राप्ती होईल. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळे आणि चमकदार वस्त्रे परिधान करावे. आभूषणे घालून सजाववे.