150 वर्ष जुनं हे शिवमंदिर पाण्याखाली वसलंय
भारतात अनेक धार्मिक ठिकाणं वसली आहेत. प्रत्येक ठिकाणाची आपली अशी खासियत आणि कथा आहे. देशात भाविकांची काही कमी नाही, धार्मिक ठिकाणी नेहमीच भाविकांची खच्चून गर्दी पाहायला मिळते. अशात तुम्हीही जर धार्मिक पर्यटनाचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास मंदिर घेऊन आलो आहोत ज्याला जीवनात एकदा तरी भेट द्यायला हवी. मंदिर तामिळनाडूतील पुडुकोट्टई जिल्यात वसले आहे.
5 वर्षांनंतर अखेर या तारखेपासून सुरु होणार Kailash Mansarovar Yatra; संपूर्ण माहिती जाणून घ्या
पुडुकोट्टई जिल्हा त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संपत्तीसाठी ओळखला जातो. येथील लेणी, प्राचीन मंदिरे, किल्ले आणि पुतळे पाहून कोणीही थक्क होईल. या जिल्ह्यात एक अद्वितीय मंदिर आहे ज्याविषयी अनेकांना फारशी माहिती नाही. हे मंदिर पाण्याखाली वसलं आहे. हे रहस्यमय शिवलिंग पुडुक्कोटाई जिल्ह्यातील नॉर्थमलाई भागात आहे, जे मुख्य शहरापासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर आहे.
नॉर्थमलई हा एक लहान पण अतिशय खास परिसर आहे, जो नऊ लहान टेकड्यांनी वेढलेला आहे – मेलामलाई, कोट्टाईमलाई, कादंबरा मलाई, परायर मलाई, उवक्कन मलाई, आलुरुट्टी मलाई, बोम्मडी मलाई, मनामलाई आणि पोनमलाई. हा परिसर एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम ठिकाण मानला जाते. इथे इतिहास, निसर्ग आणि श्रद्धेचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो.
धबधब्याच्या रस्त्याला लपलं आहे शिवमंदिर
मेलामलाईकडे जाताना एक सुंदर धबधबा आहे ज्याचे नाव सिंगम सुनाई असे आहे. या धबधब्याच्या जवळ एक रहस्यमय गुहा आहे. या गुहेत एक शिवमंदिर बांधण्यात आले आहे, जे भगवाब शिवाला समर्पित आहे. हे मंदिर सुमारे १५ फूट खोल आहे आणि त्याला “जिरहरेश्वर गुहा मंदिर” असे म्हटले जाते. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथील शिवलिंग गुहेच्या आत, पाण्याखाली वसले आहे.
जर तुम्ही दिवसाच्या उजेडात इथे गेलात तर तुम्हाला गुहेच्या आत जाण्याचा मार्ग दिसेल. त्यांनतर पुढे जाताच तुम्हाला इथे हे शिवलिंग पाहता येईल. गुहेत दडल्यामुळेच अनेकांना या मंदिरांची फारशी माहिती नाही. ही गुहा बऱ्याचदा पाण्याने भरलेली असते. या मंदिराजवळ एक शिलालेख आहे जो या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व आणखीन खास बनवतो. या शिलालेखात असे नमूद आहे की १८५७ मध्ये पुडुकोट्टई येथील राजा रामचंद्र थोंडमन यांच्या राणीने या धबधब्यातून पाणी घेऊन शिवलिंगाची पूजा केली होती.
शिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी
गुहेत लपलेलं हे मंदिर अधिकतर पाण्याने भरलेले असते पण शिवरात्रीसारख्या खास प्रसंगी इथे स्थानिक लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते या प्रसंगी इथे मोटार बसवून गुहेतील संपूर्ण पाणी बाहेर काढतात आणि यांनतर इथे शिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. कोणत्याही आवाजाशिवाय आणि गर्दीशिवाय, इथे साधेपणाने पूजा केली जाते परंतु ती श्रद्धेने परिपूर्ण असते.