अक्रोडची चटणी खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे
शरीरामध्ये युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. युरिक ऍसिड वाढल्यानंतर संधिवात, सांधेदुखी, मूत्राशयाचे आजार इत्याद समस्या उद्भवण्याची शक्यता असते. युरिक ऍसिड हे शरीरातील रसायन आहे. शरीरामध्ये प्युरीनची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात प्युरीन असलेल्या अननपदार्थांचे जास्त सेवन करू नये. युरिक ऍसिड रक्तातील क्रिस्टल्सचे रूप घेऊन नंतर सांध्यांमध्ये जमा होऊ लागते. सांध्यांमध्ये जमा झाल्यानंतर संधिवात, सांधेदुखी इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली युरिक ॲसिड मुळासकट काढून टाकण्यासाठी आहारात अक्रोडाची चटणी कशी तयार करावी? या चटणीचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरामध्ये वाढलेली युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आहारात अक्रोडचे सेवन करावे. अक्रोड खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अक्रोडमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळून येते. याशिवाय यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. अक्रोडमध्ये निरोगी चरबीचे प्रमाण अधिक असते. अक्रोडच्या चटणीचे नियमित सेवन केल्यास सांध्यांना आलेली सूज कमी होऊन वेदनांपासून सुटका होईल. अक्रोडच्या चटणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते.
अक्रोडची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, तव्यामध्ये अक्रोड हलकेसे भाजून घ्या. त्यानंतर त्यानंतर लसूण, कढीपत्ता, लाल मिरची, आले आणि ऑलिव्ह ऑइल टाकून काहीवेळ व्यवस्थित मिक्स करा. नंतर मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य टाकून व्यवस्थित बारीक करून घ्या. त्यानंतर फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी. कढीपत्ता टाकून गॅस बंद करा. तयार फोडणी चटणीवर टाकून मिक्स करा.
चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, तुळशीची पाने, कडुलिंबाची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर धुवून घेतलेल्या पानांमधील पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात टाका. नंतर त्यात हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या टाकून व्यवस्थित चटणी बारीक वाटून घ्या. त्यानंतर चटणी वाटीमध्ये काढून त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चटणी.
सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठीआहारात हिरव्या चटणीचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. या चटणीचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. कोथिंबिरीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. याशिवाय कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते.