आतड्यांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी चपातीच्या पिठात मिक्स करा 'हा' गुणकारी पदार्थ
दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव, पाण्याची कमतरता, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहार आणि जीवनशैलीत होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आहारात शरीरास पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकदा पोटात दुखणे, जळजळ, अपचन, ऍसिडिटी इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. आतड्यांचे आरोग्य बिघडल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी चपातीच्या पिठामध्ये कोणत्या बियांचे पीठ मिक्स करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
महिनाभर नियमित करा केशरच्या पाण्याचे सेवन, आरोग्यासह त्वचेला सुद्धा होतील चमत्कारीत फायदे
आतड्यांच्या आरोग्यासाठी जवसाच्या बिया अतिशय फायदेशीर आहेत. या बियांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय पचनक्रिया सुधारते. पोटासंबंधित कोणत्याही समस्येपासून आराम मिळवण्यासाठी चपातीच्या पिठात जवसाच्या बियांचे पीठ मिक्स करून खावे. यामुळे पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जवसाच्या बियांचे सेवन करावे. याशिवाय आरोग्यासंबंधित इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जवसाच्या बियांचे नियमित सेवन करावे.
जवसाच्या बियांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे काहीवेळा शरीराची पचनक्रिया बिघडते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी जवसाच्या बियांचे सेवन करावे. बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यास एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा जवसाच्या बियांची पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे शरीरातील गॅस आणि पचनाची समस्या दूर होईल. आतड्यांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी जवसाच्या बिया खाव्यात.
शरीरात सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीराचे रक्तशुद्ध करून शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. ज्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी जवसाच्या बियांचे सेवन करावे. कोमट पाण्यात जवस टाकून रात्रभर भिजत ठेवावा. त्यानंतर सकाळी उठून उपाशी पोटी पाण्याचे सेवन करावे. यामुळे लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
सावधान! महिलांच्या ‘या’ चुका ठरू शकतात गर्भपाताचे कारण, दुर्लक्ष केल्यास उद्भवतील गंभीर समस्या
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. याशिवाय योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीरातील इतर अवयवांनासुद्धा इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. याशिवाय नियमित जवसाच्या बियांचे पाणी प्यावे. हे पाणी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.