कोणताही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात दुखतात? 'हे' उपाय करून घ्या दातांची योग्य काळजी
दात दुखणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. दात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते. पण दातांमध्ये वाढलेल्या असह्य वेदना सहन होत नाही. अशावेळी मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्या आणून खाल्ल्या जातात. मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे किडनीवर अतिशय वाईट परिणाम होतात. त्यामुळे वारंवार पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करू नये. कोणताही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा तिखट, थंड पदार्थ खाल्ल्यानंतर दातांमध्ये सनक जाते आणि दातांच्या वेदना वाढतात. गोड पदार्थ खाल्ल्यानंतर दातांमध्ये संवेदनशीलता जाणवू लागते. दातांना आलेली सूज, कीड आणि दातांच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात.(फोटो सौजन्य – istock)
पुरूषांनो सावधान! Prostate बाबत असणारे Silent Signs करू नका दुर्लक्षित, जाईल जीव
काहींना वारंवार गोड पदार्थ खाण्याची सवय असते. सतत गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे साखर तोंडातील जीवाणूंशी मिळून आम्ल तयार करते. तयार झालेलं अमल दातांचा बाह्य थरावर साचून राहते, ज्यामुळे इनेमल हळूहळू झिजते आणि दातांवर छोटे छोटे छिद्र तयार होतात. दातांमध्ये तयार झालेल्या छिद्रांमध्ये अन्नपदार्थांचे बारीक कण साचून राहतात. यामुळे दातांना कीड लागते. दातांची संवेदनशीलता वाढल्यामुळे तिखट किंवा गोड पदार्थांचे सेवन केल्यानंतर दात दुखतात. यामुळे हिरड्यांना हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांच्या वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दातांच्या वेदना वाढू लागल्यानंतर घरगुती उपाय करावेत. यामुळे दातांच्या समस्या कमी होतात. यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून दिवसभरातून चार ते पाच वेळा गुळण्या कराव्यात. गुळण्या केल्यामुळे दात आतून स्वच्छ होतात आणि दातांमध्ये चिकटलेले घाणीचे कण बाहेर पडून जातात. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे तोंडातील सूज कमी होते आणि जीवाणू नष्ट होतात. दात स्वच्छ करण्यासाठी लवंग तेलाचा सुद्धा वापर केला जातो. कापसाच्या गोळ्यावर लवंग तेल लावून दातांना सूज आलेल्या भागात किंवा किडलेल्या भागात ठेवल्यास तात्काळ वेदनांपासून आराम मिळेल. हळदीमध्ये असलेले अँटी बॅक्टरीयल गुणधर्म हिरड्यांच्या समस्यांपासून आराम मिळवून देतात. दात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर हळदीचा लेप दातांवर लावून ठेवावा. त्यानंतर दात पाण्याने स्वच्छ करावेत.
थंड किंवा गोड पदार्थांचे सेवन केल्यानंतर दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी लसूणचा वापर करावा. लसूण आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. दात स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा दात स्वच्छ करावेत. दात व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. फ्लोराइडयुक्त टूथपेस्टचा वापर केल्यास दात स्वच्छ होतील. दातांच्या वेदना वाढल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
दातांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स:
जीभ ब्रशने किंवा टंग स्क्रॅपरने स्वच्छ करा, जेणेकरून तोंडातील बॅक्टेरिया कमी होतील. दिवसातून दोनदा, हिरड्यांच्या रेषेवर हलक्या हातांनी ब्रश करा
दात दुखल्यास काय करावे?
जर दाताच्या मज्जातंतूमध्ये संसर्ग झाला असेल, तर दातदुखी होऊ शकते.अशा परिस्थितीत, रूट कॅनल उपचार किंवा प्रतिजैविके आवश्यक असू शकतात.वेदना आणि सूज कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोल्ड लेझर फोटोथेरपी देखील वापरली जाऊ शकते.
अक्कल दाढ काढण्याची गरज कधी पडते?
जर अक्कल दाढ वेदना देत असेल, त्याभोवती अन्न अडकत असेल किंवा संसर्ग होत असेल तर ती काढून टाकणे आवश्यक आहे.






