कोणत्याही भाजीत जितके जास्त तेल असेल तितकी ती भाजी चविष्ट होईल असा अनेकांचा समज आहे. तसेच अनेकदा तेलाने भरलेले तेलकट पदार्थ तरुणांना फार आवडत असतात, लहान मुले तर नियमित अशा तेलकट पदार्थांचे सेवन करत असतात. तेलामुळे जेवणाची चव तर वाढतेच पण त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्याही वाढत असतात.
संशोधनातून असे दिसून आले आहे की लोक, विशेषत: घरी स्वयंपाक करणाऱ्या महिलांना त्यांच्या जेवणातील तेलाचे प्रमाण कमी करायचे आहे. पण सवय अशी झाली आहे की भाज्यांना तेल आपोआपच मिसळते. अशा वेळी खाद्यपदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण नियंत्रणात कसे ठेवावे यासाठीच्या काही सोप्या टिप्स फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने शेअर केल्या आहेत. पदार्थांमध्ये अधिक तेलाचा वापर केल्याने लठ्ठपणा, हृदयावर वाईट परिणाम अशा अनेक समस्या उद्भवतात.
FSSAI ने सांगितल्या आहारात तेलाचे प्रामण कमी करण्याचे सोपे उपाय
FSSAI ने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम हे स्पष्ट केले आहे की, जास्त तेल किंवा चरबी खाल्ल्याने कोणते नुकसान होऊ शकतात. या पोस्टनुसार, जास्त तेल किंवा चरबी खाल्ल्याने लठ्ठपणा, संबंधित असंसर्गजन्य रोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो. इतकेच नाही तर अतिरिक्त तेल आणि चरबीमुळे हृदयाचे विविध आजार होऊ शकतात.
[read_also content=”ब्रेन ट्यूमरचे प्रकार, कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार https://www.navarashtra.com/lifestyle/brain-tumor-symptoms-types-causes-and-treatment-537650.html”]
असे करा या समस्येचे निराकारण