कांद्याच्या रसाचे फायदे
केस गळतीच्या समस्येने सर्वच महिला, पुरुष त्रस्त आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. शिवाय केसांमध्ये कोंडा होणे, केसांमध्ये केस गळून टक्कल पडणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागल्या आहेत. शरीरात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात बदल करून शरीर आणि केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. वाढलेले वय, हार्मोनल असंतुलन, केमिकल प्रॉडक्टचा अतिप्रमाणात केला जाणार वापर इत्यादी अनेक कारणांमुळे केसांची वाढ थांबते आणि नवीन केस पुन्हा येत नाहीत. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरतात, ज्याचा चुकीचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केसांची वाढ थांबल्यानंतर किंवा केसांवर टक्कल पडण्यास सुरुवात झाल्यानंतर केमिकल ट्रीटमेंट करून घेण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून केसांची योग्य ती काळजी घ्यावी. केसांच्या वाढीसाठी घरगुती पदार्थ अतिशय फायदेशीर ठरतात. या पदार्थांच्या वापरामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस तुटण्यापासून वाचतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या निरोगी वाढीसाठी कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
कांद्याचा रसाचा वापर केसांच्या निरोगी वाढीसाठी केला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म केसांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. दैनंदिन वापरात केमिकल युक्त तेलाचा वापर करण्याऐवजी कांद्याच्या रसाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर करावा. यामुळे केस सुंदर आणि लांबलचक होतात. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. याशिवाय केसांमध्ये झालेला कोंडा आणि खाज निघून जाते. कांद्याचा वापर केसांसाठी केल्यामुळे केसांची वाढ भराभर होते आणि केस चमकदार सुंदर दिसू लागतात. केसांच्या वाढीसाठी कांद्याच्या रसाचा वापर करावा.
कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिक्स करून लावल्यास केसांची वाढ चांगली होईल आणि केस सुंदर दिसतील. मागील अनेक वर्षांपासून केसांच्या घनदाट वाढीसाठी खोबरेल तेलाचा वापर केला जात आहे. खोबरेल तेलात असलेले गुणधर्म केसांच्या वाढीसाठी मदत करतात. खोबरेल तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे टाळूवरील कोंडा कमी होतो.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
खोबरेल तेलात 2 चमचे कांद्याचा रस मिक्स करून केसांवर लावल्यास केसांची वाढ झपाट्याने होईल आणि केस सुंदर आणि चमकदार दिसतील. कांद्याचा रस केसांवर लावून 1 तास ठेवून नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केस गळती थांबून केस सुंदर आणि चमकदार दिसतील. हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा.