त्वचेच्या सर्व समस्यांपासून आराम मिळ्वण्यासाठी 'या' पद्धतीने करा फुलाचा वापर
गणपती बाप्पाच्या पूजेसाठी जास्वंदीचे फुल प्रत्येक घरात आवर्जून आणले जाते. लाल रंगाच्या जास्वंदीच्या फुलाचा वापर धार्मिक पूजेसाठी केला जातो.याशिवाय जास्वंदीच्या फुलाचा वापर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा केला जातो. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेसपॅक लावला जातो तर कधी फेसमास्क लावून त्वचेची काळजी घेतली जाते. जास्वदींच्या फुलामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, विटामिन आणि ॲमिनो अॅसिड्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. मुरूम किंवा पिंपल्समुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि रुक्ष होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. आज आम्ही तुम्हाला त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी जास्वंदीच्या फुलात कोणते पदार्थ मिक्स करून त्वचेवर लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक वाढेल.(फोटो सौजन्य – pinterest)
जास्वदींच्या फुलांचा वापर त्वचा आणि केसांसाठी केला जातो. या फुलांचा वापर करून हेअरमास्क, स्किन केअर प्रॉडक्ट, स्किन टोनर इत्यादी अनेक वस्तू तयार केल्या जातात. जास्वंदीच्या फुलांचा फेसपॅक लावल्यामुळे मुरुमांच्या समस्या, कोरडेपणा, सुरकुत्या किंवा चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होईल. तसेच उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होण्यास मदत होते. नैसर्गिक पदार्थ त्वचेचे सौंदर्य कायम टिकवून ठेवतात. यामुळे चेहरा अधिक उजळदार आणि सुंदर दिसतो.
जास्वदींचे फुल आणि दह्याचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये ३ किंवा ४ फुल बारीक करून घ्या. तयार केलेल्या पेस्टमध्ये दही टाकून मिक्स करा.फेसपॅक व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून 10 किंवा 15 मिनिटं ठेवून द्या. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करते. जास्वदींची फुल त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी जास्वदींच्या फुलाचा वापर करावा.
धुतलेले केस ओले असताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, अन्यथा केस होतील झाडू सारखे खराब आणि कोरडे
उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मधाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये जास्वदींच्या फुलांची पेस्ट घेऊन त्यात मध मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर १५ मिनिटांनी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि चेहरा सुंदर दिसू लागेल. मध त्वचेला नैसर्गिकरीत्या मॉइश्चराईझ करते. यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो.