खराब झालेली त्वचा डिटॉक्स करण्यासाठी 'या' आयुर्वेदिक पद्धतीचा करा वापर
बदलत्या वातावरणाचा परिणाम महिलांसह पुरुषांच्या त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, पाण्याचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. यामुळे त्वचेची गुणवत्ता बिघडते. त्वचेवर गुणवत्ता बिघडल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. पिंपल्स, पुरळ आणि मुरुमानी खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी वेगवेगळ्या ट्रीटमेंट तर कधी त्वचा सुधारण्यासाठी घरगुती उपाय केले जाते. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते.(फोटो सौजन्य – iStock)
गोरं दिसण्याची हौस पडेल महागात! Fairness treatement करण्याचा विचार करताय? आधी हे वाचा
शरीरातील अवयव निरोगी राहण्यासाठी बॉडी डिटॉक्स केली जाते, त्याप्रमाणेच त्वचा डिटॉक्स करणे सुद्धा आवश्यक आहे. त्वचा डिटॉक्स केल्यामुळे त्वचेमध्ये साचून राहिलेले हानिकारक घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स, मुरूम, मोठे फोड येऊ लागतात. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्वचा आतून स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचा डिटॉक्स करण्यासाठी आयुर्वेदातील काही सोपे उपाय सांगणार आहोत, चला तर जाणून घेऊया.
शरीरात साचून राहिलेले हानिकारक घटक त्वचा आणि आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि मुरूम येण्याची शक्यता असते. सौना किंवा स्टीम बाथ घेतल्यामुळे त्वचेमधील घाण बाहेर पडून जाते आणि त्वचा स्वच्छ होते. त्वचेमधील घाण चेहऱ्यावर तशीच साचून राहिल्यामुळे पिंपल्स आणि इतर समस्या उद्भवू लागतात. त्वचेवर घाम आल्यामुळे रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळते. स्टीम बाथ घेतल्यामुळे शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेला गती मिळते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्टीम बाथ घेतल्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार होते.
त्वचेचे रक्तभिसरण सुधारण्यासाठी त्वचेला मसाज किंवा मालिश करणे आवश्यक आहे. तेलाचा मसाज त्वचेवर केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. तेलाचा वापर केल्यामुळे शरीरातील विविध दोषांचे संतुलन सुधारते. तेलाने त्वचा मसाज केल्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो आणि त्वचा चमकदार होते.
आलीय भट्ट आपल्या त्वचेचा आणि केसांची कशी घेते काळजी? काय आहे तिच्या सुंदरतेचा राज? बघुयात
प्रत्येकाच्या शरीरात वात दोष असते. पण वाताचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तिळाचे तेल वापरावे. तिळाचे तेल अतिशय उष्ण आहे. या तेलाने मसाज केल्यास त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो आणि त्वचा चमकदार सुंदर दिसते. त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या तेलाने मसाज करावा.