(फोटो सौजन्य - Social Media)
व्हॅलेंटाईन आठवड्याला सुरुवात होत आहे. ७ फेब्रुवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जगभरात प्रेमाचे वादळ येणार आहे. प्रियकर आणि प्रियसी तसेच विवाहित जोडप्यांचे प्रेम गगनाला भिडणार आहे. या मिंगल लोकांचं तर काम झालं. तर सिंगल लोकांचं काय? नक्कीच, जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल कि आता या Valentine Week मध्ये आम्ही काय करायचं बाबा? तर हा Valentine Week तुम्हाला स्पेशल बनवायचा असेल आणि आनंदाने साजरा करायचा असेल तर काही प्लॅन आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्ही हे दिवस साजरे करू शकता.
मुळात, हे दिवस प्रेमाचे दिवस म्हणून ओळखले जातात. या दिवसात स्वतःची विशेष काळजी घ्या. स्वतःवर विशेष प्रेम करा. चांगला फेस मास्क लावा. स्किन केअर करा. या दिवशी तुम्ही स्वतःसाठी काही तरी खरेदी करू शकता. स्वतःला आणखीन उत्तम कसे बनवता येईल या गोष्टींवर लक्ष द्या. उगाच इतर कपल्सकडे पाहून स्वतःचे मन दुखवू नका. या दिवशी खूप खा आणि मज्जा करा. स्वतःवर प्रेम करा.
जोडीदार नसला तरी आपल्याकडे आपले मित्र मैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत छानसा चित्रपट पाहायला जा. तुमचा वेळ कुटुंबाला द्या. त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारा. जगात तुम्ही एकटे सिंगल नाही आहात. तुमच्या मित्र मंडळींमध्येही काही सिंगल असतील. त्यांना एकत्र करा आणि छान पार्टी करा. अशा धुरळा करा कि कपल्स लोकंही तुमच्या सिंगल मित्र मंडळींकडे पाहून आश्चर्य व्हायला हवेत. या दिवशी आपले छंद जोपासा. डान्स करा, गा, काही तरी पंचपक्वान्न तयार करा किंवा नवीन वाद्य वाजवायला शिका. जर एकटे फिरण्याची आवड असेल तर छानशी सोलो ट्रिप प्लॅन करा.
या दिवसांत तुम्ही समाजकार्य करून आपल्याशी प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत भर करू शकता. गरजू लोकांना मदत करा. एखाद्या NGOमध्ये जाऊन मुलांसोबत वेळ घालवा किंवा कोणाला सरप्राइज गिफ्ट द्या. घरातील पाळीव प्राण्यांसोबत खेळा आणि त्यांना वेळ द्या. याने इतरांशी जिव्हाळ्याचे नाते तयार होईल. या प्रेमाच्या दिवसात आपल्याशी प्रेम करणाऱ्या लोकांच्या संख्येत जर वाढ होत असेल तर यापेक्षा दिवस साजऱ्या करण्याचा उत्तम मार्ग कोणताच नाही. अशाप्रकारे व्हॅलेंटाइन डे तुम्हाला स्वतःसाठी आणि इतरांसाठी आनंदी करण्याचा छान अनुभव देऊ शकतो.