विराट कोहलीच्या आवडत्या फ्राईड राईची रेसिपी
भाताबद्दल एक गोष्ट नेहमी बोलली जाते ती म्हणजे ते जास्त खाऊ नका, त्यामुळे तुमचे वजन वाढते. पण आज आम्ही तुम्हाला तांदळाची अशीच एक रंजक गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तांदूळ आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकतो. होय, आज आम्ही विराट कोहलीची खास फ्राईड राइस रेसिपी शेअर करणार आहोत जी आरोग्य आणि चव या दोन्ही बाबतीत नंबर वन आहे.
घरी शिजवलेले कोणतेही अन्न स्वादिष्ट असते. पण जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी वापरायच्या असतील तर तुम्ही क्रिकेटर विराट कोहलीची फ्राईड राइसची हेल्दी रेसिपी वापरून पाहू शकता. विराट कोहलीचा हा सर्वात आवडता फ्राईड राईस आहे आणि तो कशा पद्धतीने तुम्हीही घरी करून खाऊ शकता याबाबत आम्ही तुम्हाला सांगतोय (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)
काय आहे वेगळेपणा
फ्राईड राईस रेसिपीमधील वेगळेपणा
अलीकडेच, स्टँड-अप कॉमेडियन राहुल सुब्रमण्यनसोबत यूट्यूबवरील खाद्यपदार्थांबद्दलच्या एका खास चॅट शोमध्ये बोलताना विराटने सांगितले की, विराटचा हा खास फ्राईड राईस बनवताना त्यात व्हेजिटेबल स्टॉक टाकून फ्राईड राइस बनवतो. त्यामुळे चव पूर्णपणे बदलते आणि अधिक चांगली लागते. तुम्ही कुठेही खाल्लेल्या कोणत्याही रस्त्यावरील तळलेल्या भातापेक्षा तो चांगला आहे असं विराटचं म्हणणं आहे.
हेदेखील वाचा – लहान मुलांसाठी घरीच तयार करा क्रिस्पी मिनी सामोसा, नोट करा सिंपल रेसिपी
चिकन क्रिस्पीची होती आवड
या गप्पांदरम्यान विराटने हेही सांगितले की, जेव्हा तो बंगळुरूला आला तेव्हा त्याला वाटत होतं की, डोसा म्हणजे बीटरूट आणि गाजराचे मिश्रण. पण बंगलोरला आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच क्रिस्पी डोसा खाल्ला. ज्याची चव तो कधीच विसरू शकत नाही. पुढे तो म्हणतो की त्याने आणखी एक डिश चाखून पाहिली होती आणि ती त्याच्यासाठी अत्यंत खास ठरली, ते चिकन क्रिस्पी होते. जेव्हा तो 13 वर्षांचा होता तेव्हा तो एका वेळी 30-40 तुकडे चिकन क्रिस्पी खात असे असंही त्याने आवर्जून सांगितले.
हेल्दी सिक्रेट रेसिपी
फ्राईड राईस रेसिपी
विराट कोहलीने घरगुती व्हेजी फ्राईड राइस आणखी चविष्ट बनवण्यासाठी एक खास सिक्रेट रेसिपी सांगितली आहे आणि ही रेसिपी तुम्हीही वापरून पाहू शकता. अलीकडेच या खेळाडूने शेअर केले की तो त्याच्या फ्राईड राईसची चव वाढवण्यासाठी तो भाज्यांचा स्टॉक वापरतो. विराट कोहली हा एक असा क्रिकेटर आहे जो त्याच्या फिटनेस आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे अनेकांना वाटतं की तो भात खात नसेल पण त्याने ही रेसिपी शेअर करत हे हेल्द सिक्रेट सांगितले.
हेदेखील वाचा – घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत पोटॅटो फिंगर्स, जाणून घ्या रेसिपी
कसा बनवावा फ्राईड राईस
फ्राईड राईसमध्ये व्हेजिटेबल स्टॉक घातल्यास त्याची चव दुप्पट चांगली होते. याशिवाय अनेक प्रकारच्या भाज्या, मसाले त्यात मिक्स करून उकळून हा भात बनवला जातो. याशिवाय या फ्राईड राईसमध्ये विविध प्रकारच्या भाज्या, मसाले, कांदे, गाजर, भाजी किंवा तमालपत्रं, लसूण आणि मीठ यांचे योग्य मिश्रण फ्राईड राईसची चव वाढवतात. तुम्ही चिकन स्टॉक सोबत पण हा फ्राईड राईस करून पाहू शकता.