(फोटो सौजन्य: istock)
“फिरायला कोणाला आवडत नाही! प्रत्येकालाच नवीन ठिकाणं पाहायची, तिथलं सौंदर्य अनुभवायचं आणि वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्यायच्या असतात. मात्र, अनेकदा ट्रॅव्हल प्लॅन करताना सर्वात मोठा प्रश्न बजेटचा असतो. पण सुंदर आणि अविस्मरणीय ट्रिपसाठी नेहमीच जास्त खर्च होणं आवश्यक नाही. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही ठिकाणांविषयी जिथे तुम्ही फक्त ₹5000 रुपयांच्या आत एक धमाल आणि आठवणीत राहणारी ट्रिप प्लॅन करू शकता. या दिवाळीतल्या लॉन्ग वीकेंडमध्ये नक्की फिरून या या ठिकाणी.
भारतात या ठिकाणी वाहतात 17 नद्या, शांततेच वातावरण अनुभवायचं असेल तर नद्यांच्या शहरांना जरूर भेट द्या
1. वाराणसी
काशी किंवा बनारस म्हणून प्रसिद्ध असलेलं वाराणसी हे जगातील सर्वात जुनं आणि पवित्र शहर मानलं जातं. गंगा घाटांवरील आरती, मंदिरं आणि इथलं अध्यात्मिक वातावरण तुमचा सारा थकवा दूर करेल. जर तुम्ही दिल्लीहून वाराणसीला जात असाल, तर ट्रेन हा उत्तम पर्याय आहे – एका बाजूचं भाडं सुमारे ₹500 मध्ये मिळू शकतं. तिथे राहणं आणि जेवणाचा खर्च मिळून ₹1000 ते ₹1500 प्रति रात्र इतका येतो. म्हणजेच पूर्ण ट्रिप अगदी बजेटमध्ये होऊ शकते.
2. अमृतसर
कमी खर्चात इतिहास आणि श्रद्धा अनुभवायची असेल तर अमृतसर सर्वोत्तम ठिकाण आहे. सुवर्ण मंदिर, जलियांवाला बाग आणि वाघा बॉर्डर यांसारखी प्रसिद्ध स्थळं पाहून मन भारावून जाईल. दिल्लीहून ट्रेन किंवा बसने अमृतसर पोहोचू शकता. प्रवासाचं भाडं अंदाजे ₹600 ते ₹700 येईल, आणि राहणं-खाणं मिळून पूर्ण खर्च ₹2000 ते ₹2500 च्या दरम्यान राहील.
3. जयपूर
‘पिंक सिटी’ म्हणून प्रसिद्ध जयपूर हे बजेट ट्रिपसाठी एकदम योग्य ठिकाण आहे. येथे हवा महाल, आमेर किल्ला, सिटी पॅलेस यांसारखी आकर्षक ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. दिल्लीहून बसने जयपूरला जाण्याचा खर्च सुमारे ₹800 होतो. इथे हॉस्टेल्समध्ये राहण्यासाठी ₹500 पासून दररोजचे रेट मिळतात. त्यामुळे राहणं आणि खाणं मिळून ₹3000 मध्ये एक सुंदर ट्रिप एन्जॉय करता येते.
4. उदयपूर
तलावांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं उदयपूर हे 5000 रुपयांतही पाहता येऊ शकणारं सुंदर ठिकाण आहे. ऐतिहासिक महाल, राजवाडे आणि शांत तलाव यांचं सौंदर्य तुमचं मन जिंकून घेईल. दिल्लीहून ट्रेन किंवा बसने इथे पोहोचता येतं. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा उदयपूरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.
5. कसोल
जर तुम्हाला डोंगर, निसर्ग आणि शांततेचं सौंदर्य अनुभवायचं असेल, तर हिमाचलमधील कसोल हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. हिरवीगार दऱ्या, बर्फाच्छादित पर्वत आणि ताज्या हवेतला अनुभव अविस्मरणीय ठरेल. कसोलची ट्रिप अत्यंत परवडणारी आहे, राहणं आणि जेवण यासाठी साधारण ₹1000 ते ₹1500 प्रति दिवस खर्च येतो. त्यामुळे 3-4 दिवसांत हा प्रवास सहज ₹5000 मध्ये होऊ शकतो. तर या दिवाळीत जास्त खर्च न करता, सुंदर आठवणी तयार करा आणि भारतातील या अप्रतिम ठिकाणांचा आनंद घ्या.