पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओली अंतर्वस्त्र घातल्यास होऊ शकता 'हा' गंभीर आजार
संपूर्ण देशभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पाऊसामुळे सगळीकडे थंड वातावणार झाले आहे. पावसाळा ऋतू सगळ्यांचं सुखकर आणि आल्हाददायक वाटतो. मात्र या ऋतूंमध्ये सार्वधिक साथीचे आजार पसरण्याची जास्त शक्यता असते. त्वचा आणि आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर अनेक लोक सतत दुर्लक्ष करतात, मात्र वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे हेच छोटे आजार मोठे स्वरूप घेतात आणि आरोग्याची हानी होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे आणि आद्र्रतेमुळे कपडे लवकर सुकत नाहीत. कपडे सुकल्यानंतर सुद्धा ओले असल्यासारखेच वाटू लागतात. शरीरावर ओले कपडे किंवा ओले अंतर्वस्त्र घातल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
अंतर्वस्त्र ओली राहिल्यानंतर ती इस्त्रीच्या साहाय्याने सुकवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरीसुद्धा बऱ्याचदा अंतर्वस्त्र सुकत नाहीत. अशीच ओली अंतर्वस्त्र घातल्यामुळे शरीराच्या नाजूक अवयवांना इजा पोहण्याची जास्त शक्यता असते. ओली अंतर्वस्त्र घातल्यामुळे उद्भवणारा गंभीर आजार म्हणजे युटीआय. युटीआय हा मुत्रमार्गाचा संसर्ग आहे जो प्रामुख्याने महिलांमध्ये दिसून येतो. 50 ते 60 टक्के प्रौढ महिलांना आयुष्यात एकदातरी युटीआयचा संसर्ग होतो. ज्यामुळे शरीराच्या अतिशय नाजूक अवयवांना हानी पोहचते. ६० पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांमध्ये युटीआय होण्याची प्रमाण अधिक आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये युटीआयची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढते. हा आजार होण्याचे मुख्य कारण म्हणजे नेहमीच अंगावर घातली जाणारी ओली अंतर्वस्त्र किंवा ओले कपडे. तज्ज्ञांच्या मते, कोणतीही व्यक्ती घट्ट किंवा ओली अंतर्वस्त्र घालत असेल युटीआय संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. हा ओलावा बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल ठरतो, ज्यामुळे लघवी करताना सतत जळजळ होणे किंवा वेदना होण्याची जास्त शक्यता असते.
डोळ्यांची कमी झालेली नजर होईल तीक्ष्ण! चष्म्याचा नंबर कायमचा घालवण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ
ओव्या कपड्यांमुळे मूत्रमार्गात ओलावा अधिककाळ टिकून राहतो, ज्यामुळे जननेंद्रियाजवळ बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होऊ लागते. जननेंद्रियाजवळ बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढीस शरीरातील अंतर्गत ओलावा पोषक ठरतो. पीएच पातळीत असंतुलन झाल्यामुळे आणि नाजूक अवयवांमधील अस्वच्छता वाढल्यामुळे यूटीआय होण्याची शक्यता असते. तसेच काहींना सिंथेटिक फॅब्रिक असलेले कपडे परिधान करण्याची सवय असते. पण या कपड्यांमधून हवा बाहेर जात आणि ओलावा कायमच टिकून राहतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओले कपडे घालू नये.
यूटीआय म्हणजे काय?
यूटीआय म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग. मूत्रमार्ग म्हणजे मूत्रपिंड, मूत्राशय आणि मूत्रनलिका. या भागांमध्ये होणाऱ्या संसर्गाला यूटीआय म्हणतात.
यूटीआय होण्याची कारणे काय आहेत?
जीवाणू मूत्रमार्गात प्रवेश केल्यामुळे यूटीआय होतो.काहीवेळा इतर आरोग्य समस्यांमुळे देखील यूटीआय होऊ शकतो. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा यूटीआय होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांची मूत्रनलिका लहान असते आणि जीवाणूंना संसर्गासाठी कमी अंतर पार करावे लागते.
यूटीआय वर उपचार काय आहेत?
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके घेणे, भरपूर पाणी पिणे, विश्रांती घेणे. भरपूर पाणी प्या, लघवी धरून ठेवू नका, लैंगिक संबंधानंतर लगेच लघवी करा, खाजगी भागांची स्वच्छता राखा, कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन टाळा.