त्वचा सोलली जाण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
हिवाळ्यामध्ये महिला आणि पुरुषांना त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीमध्ये त्वचा अधिकच कोरडी आणि रुक्ष होऊन जाते. कोरड्या त्वचेवर कितीही काही लावलं तरीसुद्धा त्वचेची गुणवत्ता सुधारत नाही. शिवाय या दिवसांमध्ये हातापायांची त्वचा सोलली जाते. हातपायांवरील स्किन निघून जाण्यास सुरुवात झाल्यानंतर त्वचा लालसर होऊन जाते. तसेच त्वचा सोलली जाताना हातांमधून रक्त येऊ लागत. त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपताना हातांना आणि पायांना क्रीम किंवा तेल लावावे, ज्यामुळे त्वचा कोरडी होऊन हातांची स्किन सोलली जाणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हातांवरील त्वचा का सोलली जाते ? या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये हातांवरील त्वचा सोलली जात असेल तर रॉक मिठाचा वापर करावा. ज्यामुळे त्वचा सोलली जाणार नाही. त्वचा स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून १० ते १५ मिनिटं हात बुडवून तसेच ठेवून घ्या. यामुळे त्वचा चांगली होईल. १५ मिनिटांनी हात पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि हातांवर व्हॅसलीन किंवा मॉइश्चरायझर लावून घ्या. हा उपाय दिवसभरातून दोन ते तीन वेळा केल्यास लवकर आराम मिळेल.
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मधाचा वापर करावा. मध वापरल्यामुळे त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळेल. यामुळे हातांवरील त्वचा निघून जाईल आणि हात स्वच्छ होतील. यासाठी हातांवर मध लावून काहीवेळ हात तसेच ठेवून द्या. १० मिनिटं झाल्यानंतर हात पाण्याने स्वच्छ धुवा.
खोबऱ्याच्या तेलात असलेले गुणधर्म त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतात. यामुळे त्वचेमधील आर्द्रता लॉक होऊन जाते. हात सोलण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी खोबरले तेल गरम तेल हातांवर लावून घ्या. यामुळे त्वचा मुलायम आणि सुंदर होण्यास मदत होईल. हा उपाय दोन ते तीन वेळा केल्यास लवकर आराम मिळेल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचेसंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडचा वापर केला जात आहे. त्यामुळे तुम्ही त्वचा सोलण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडचा वापर करू शकता. कोरफड त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो. यामुळे त्वचा थंड होते. दिवसाभरातुन दोन ते तीन वेळा हातांवरील त्वचेवरील कोरफड जेल लावावे.