चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटींप्रमाणे चमकदार ग्लो! चमचाभर मसूर डाळीचा 'या' पद्धतीने करा वापर
चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअरमध्ये बदल तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा खूप जास्त कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची योग्य काळजी घ्यावी. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, वारंवार उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्यांमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि पुरळ, मुरूम येतात. चेहऱ्यावर हेच पिंपल्स लवकर निघून जात नाही.(फोटो सौजन्य – istock)
Lifestyle Tips :साठीत वाटाल तिशीतले, ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा
प्रत्येक महिन्याला महिला क्लीनअप, फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. यामुळे चेहऱ्यावरील मळ, डेड स्किन, अतिरिक्त तेल आणि ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते. पण काही दिवसांमध्ये त्वचा होती तशीच दिसू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर सेलिब्रिटींप्रमाणे चमकदार ग्लो मिळवण्यासाठी चमचाभर मसूर डाळीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी मसूर डाळीचा वापर केला जातो. ही डाळ पदार्थाची चव वाढवण्यासाठी आणि शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा आतून स्वच्छ करतात.
मसूर डाळीमध्ये असलेले घटक त्वचा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मदत करतात. याशिवाय त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर महिला वारंवार दुर्लक्ष करतात. मात्र कालांतराने त्वचा खूप जास्त खराब आणि निस्तेज होऊन जाते. त्यामुळे त्वचा टॅन झाल्यानंतर वेळीच उपचार करावेत. मसूर डाळीमध्ये प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. चेहऱ्यावर जमा झालेला मळ आणि टॅन कमी करण्यासाठी मसूर डाळीचा वापर करावा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.
सर्वप्रथम, वाटीमध्ये दूध घेऊन त्यात मसूर डाळ २ तास भिजत ठेवा. त्यानंतर डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. पेस्ट केलेल्या डाळीमध्ये आवश्यकता वाटल्यास गुलाबपाणी मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर जमा झालेली धूळ आणि माती स्वच्छ होण्यास मदत होईल. तयार केलेली पेस्ट डोळ्यांभोवती वाढलेल्या काळ्या डागांवर लावून गोलाकार आकारात फिरवून स्क्रबिंग करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल.
कोरियन स्किनकेअर रुटीन घ्या! चेहऱ्याला येईल चमक, हिराच जणू
उरलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून २० मिनिटं तशीच ठेवून घ्या. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. या पद्धतीने क्लीनअप केल्यास चेहऱ्यावर वाढलेला टॅन आठवडाभर कमी होईल आणि त्वचा चमकदार दिसू लागेल. क्लीनअप करून झाल्यानंतर हलके मॉइश्चरायझर किंवा अॅलोवेरा जेल लावा. यामुळे चेहरा कोरडा पडणार नाही.
वाढत्या उन्हात चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मसूर डाळीचा वापर करावा. या डाळीमध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करतात. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि बारीक रेषा नष्ट करण्यासाठी मसूर डाळीचा वापर करावा. चेहऱ्यावरील रक्तभिसरण सुधारण्यासाठी मसूर डाळीचा वापर करावा.






