जाणून घ्या आईस बाथ थेरपी केल्यामुळे आरोग्याला होणारे आशचर्यकारक फायदे
निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्ती सतत काहींना काही करत असते. कधी आहारात बदल केला जातो तर कधी जीवनशैलीमध्ये बदल केले जाते. सर्वच ऋतूंनुसार आहारासह इतर अनेक गोष्टींमध्ये वारंवार बदल होत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोक थंड पाण्याची अंघोळ करतात. तर काहींना वर्षाच्या बाराही महिने थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीराला अनेक फायदे आणि तोटे सुद्धा होतात. तसेच काही लोक बर्फाच्या पाण्याची अंघोळ करतात. प्रसिद्ध गायक रॅपर बादशाहचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने बर्फाच्या टबमध्ये अंघोळ केली आहे. याला आईस बाथ थेरपी असे म्हणतात. आईस बाथ थेरपी घेतल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला आईस बाथ थेरपी म्हणजे काय? आईस बाथ थेरपी केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यांसह अनेकांनी आईस बाथ थेरपी घेतली आहे. ही थेरपी घेताना मोठ्या टबमध्ये बर्फ ठेवला जातो. या बर्फाच्या टबमध्ये बसून अंघोळ केली जाते. बॉलिवूडची प्रसिद्ध फिटनेस कोच यास्मिन कराचीवाला हिने आत्तापर्यंत अनेकांना आईस बाथ थेरपीची ट्रेनिंग दिली आहे. आईस बाथ थेरपी केल्यामुळे सांध्यांना आलेली सूज कमी होते. याशिवाय शरीरात निर्माण झालेला मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होण्यास मदत होते.
बर्फाच्या पाण्यात अंघोळ केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. थंड पाण्यात दीर्घकाळ बसल्यामुळे शरीराच्या नसा आकुंचन पावतात. याशिवाय पाण्यातून बाहेर आल्यानंतर शरीराचे तापमान सामान्य स्थितीमध्ये येते. बर्फाच्या पाण्याची अंघोळ केल्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त संपूर्ण शरीरात झपाट्याने पोहचते. तसेच स्नायूंना आराम मिळतो. शरीराचे कार्य योग्यरित्या काम करत नसेल तर तुम्ही बर्फाच्या पाण्याची अंघोळ करू शकता. यामुळे शरीराची स्थिती सुधारण्यास मदत होईल.
शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी बर्फाच्या पाण्यात अंघोळ करावी. मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बऱ्याचदा कोणत्याही कारणांवरून काहींना अस्वस्थ वाटू लागते. अशावेळी तुम्ही थंड पाण्याची किंवा बर्फाच्या पाण्याची अंघोळ करू शकता. काही मिनिटं थंड पाण्यात शांत बसून राहिल्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. याशिवाय बर्फाच्या पाण्याची अंघोळ वारंवार केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
Corona: वाढत्या करोनादरम्यान 5 मसाल्यांचे सेवन ठरेल रामबाण, Immunity होईल बुस्ट आजार होईल छुमंतर
शरीराची बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी महिन्यातून एकदा तरी बर्फाच्या पाण्याची अंघोळ करावी. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. पाण्यामध्ये खोल श्वास घेत ध्यान केल्यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाची लक्षणे कमी होतात आणि शरीर रोगांपासून निरोगी राहते.