फोटो सौजन्य: iStock
निरोगी राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या तोंडाच्या आरोग्याचा आपल्या एकूण आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. म्हणूनच आरोग्य तज्ञ नेहमीच चांगले ओरल हायजिन मेंटेन करण्याची शिफारस करतात. तसेच तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी, नियमितपणे आणि योग्यरित्या ब्रश करणे महत्वाचे असे देखील सांगतात.
योग्य ब्रशिंग म्हणजे केवळ योग्य टूथपेस्ट किंवा ब्रशिंगची पद्धत वापरणे एवढेच नाही तर त्यात वेळोवेळी टूथब्रश बदलणे देखील समाविष्ट आहे. बऱ्याचदा लोकांच्या टूथब्रशचे केस खूप खराब होतात, तरीही लोक ते फेकून देत नाहीत. नवीन टूथब्रश न घेण्याच्या आळसामुळे किंवा पैसे वाचवण्यासाठी ते तेच जुने ब्रश वापरत राहतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. गरजेपेक्षा जास्त ब्रश वापरल्याने ब्रश करण्याचा खरा उद्देशच नष्ट होतो.
मुलांच्या ‘या’ सवयी वाढवतात मधुमेहाचा धोका, बालपणीच सुधारल्या तर आयुष्यभर रहाल निरोगी
ब्रश करण्याचा उद्देश दात आणि तोंडाची पोकळी स्वच्छ करणे आहे. जेणेकरून पोकळी आणि इतर तोंडातील आजार टाळता येतील. तथापि, बराच काळ एकच ब्रश वापरल्याने त्यात बॅक्टेरिया वाढतात. तसेच यामुळे ब्रशमधील साफसफाईची क्षमता कमी होते. ज्यामुळे तोंडाची पोकळी स्वच्छ करण्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.
टूथब्रशची सवय लावणे खूप महत्वाचे आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) आणि इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) नुसार, दर ३ ते ४ महिन्यांनी टूथब्रश बदलला पाहिजे. याशिवाय, इतर काही प्रकरणांमध्ये टूथब्रश बदलणे आवश्यक होते, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.
जगातील फक्त २३ बाळांना आहे ‘हा’ आजार; इतका दुर्मिळ की आजाराला नावच नाही






