व्हायरल घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेचे कोणते नुकसान होते:
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेसपॅक लावला जातो तर कधी फेसमास्क लावून त्वचेची काळजी घेतली जाते. बदलत्या ऋतूनुसार त्वचेसंबंधित समस्या देखील बदलत जातात. उन्हाळा वाढल्यानंतर त्वचा अतिशय तेलकट किंवा चिकट होऊन जाते. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, फोड येणे, त्वचेची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करतात. पण हेच केमिकल युक्त महागडे प्रॉडक्ट त्वचा पूर्णपणे खराब करून टाकतात.(फोटो सौजन्य – iStock)
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावरील इंस्टाग्राम आणि फेसबुक मोठ्या प्रमाणात वापरले जाते. इंस्टग्रामवर घरगुती उपाय, आयुर्वेदिक आणि बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर कसा करावा, याबद्दल माहिती किंवा व्हिडिओ शेअर केला जातो. हेच व्हिडिओ पाहून महिला किंवा मुली घरी फेशिअल करणे किंवा फेसपॅक करून लावला जातो. मात्र हे उपाय केल्यामुळे काहीवेळा त्वचेची गुणवत्ता अतिशय खराब होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावरील उपाय केल्यामुळे त्वचेचे कोणते नुकसान होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी किंवा त्वचा चमकदार करण्यासाठी अनेक महिला लिंबाच्या रसाचा वापर करतात. मात्र त्वचेवर लिंबाचा रस डायरेक्ट लावू नये. यामुळे त्वचा खराब होण्याची जास्त शक्यता असते. काहींची त्वचा अतिशय संवेदनशील आणि नाजूक असते. अशा त्वचेवर लिंबाचा वापर केल्यास त्वचेचे नुकसान होते. त्वचेवर थेट लिंबाचा रस लावल्यामुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट किंवा त्वचा काळवंडून जाते.
चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर अनेक महिला पिंपल्सवर लसूण चोळतात. पण पिंपल्स आल्यानंतर त्यावर लसूण चोळणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे पिंपल्स जाण्याऐवजी पिंपल्स अधिक येऊ लागतात. यामुळे त्वचेची आग होते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे घरगुती उपाय चुकूनही करू नका यामुळे त्वचा अधिक जास्त खराब होईल..
त्वचेवरील तेलकट आणि चिकटपणा कमी करण्यासाठी अनेक महिला नियमित चेहऱ्यावर बर्फ फिरवतात. पण त्वचेवर सारखाच बर्फ लावणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे चेहरा लाल होणे, रॅश किंवा त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्वचेवर अनेक महिला थेट बर्फ लावतात. पण असे करण्याऐवजी रुमालात बर्फ ठेवून मगच चेहऱ्यावर मसाज करावा. यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण वाढेल.