बॅकलेस ड्रेसमध्ये कोणती ब्रा घालावी (फोटो सौजन्य - iStock)
मुलींना रोमँटिक डेट्सवर वेस्टर्न आउटफिट्स घालायला आवडतात. जर तुम्हीही डिनर डेटवर बॅकलेस गाऊन किंवा ड्रेस घालण्याचा विचार करत असाल पण अशा ड्रेससोबत कोणती ब्रा किंवा इनरवेअर घालावे हे तुम्हाला समजत नसेल तर बॅकलेस ड्रेससाठी कोणते इनरवेअर सर्वोत्तम आहेत ते आपण या लेखातून जाणून घेऊया
बरेचदा आपण बॅकलेस ड्रेस तर खरेदी करतो पण त्यात नक्की कशी ब्रा वापरायची हे अनेकांना माहीत नसतं. काही जणी तर विचारायची लाज बाळगतात आणि मग तो ड्रेस तसाच कपाटात पडून राहतो. पण असं अजिबात करू नका. तुम्ही जर डेटवर जाताना बॅकलेस ड्रेस घालणार असाल आणि कम्फर्टेबल रहायचे असेल तर नक्की कोणती ब्रा घालावी आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
स्टिकी ब्रा

स्टिकी ब्रा चा करा वापर
बॅकलेस ड्रेससोबत तुम्ही सिलिकॉन ब्रा कॅरी करू शकता. जर तुमच्या ड्रेसची नेकलाइन बरीच खोल अर्थात Deep असेल तर तुम्ही स्टिकी इनरवेअर कॅरी करू शकता. सिलिकॉन ब्रा तुम्हाला कोणत्याही पट्ट्याशिवाय चांगला आधार देते आणि सिलिकॉन अंडरवेअर शेप दिसू देत नाही. स्टिकी ब्रा स्तनांना घट्ट चिकटून बसते. स्टिकी ब्रा वापरण्यापूर्वी, तुमची त्वचा साबणाने स्वच्छ करा जेणेकरून Sticky Bra चिकटवताना कोणतीही समस्या येणार नाही आणि त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही.
सैलसर ब्रा मुळे त्रस्त…हंसाजींनी दिल्या नैसर्गिक टिप्स; Breast Size होईल परफेक्ट
टेप ब्रा
बॅकलेस आणि डीप नेकलाइन ड्रेससोबत तुम्ही Tape Bra कॅरी करू शकता. तुमच्या ड्रेसनुसार तुम्ही टेप ब्रा वापरू शकता. टेप ब्रा च्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीराला ड्रेसनुसार आकार देऊ शकता. टेप ब्रा वापरण्यापूर्वी तुमची त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा. त्वचेवर कोणत्याही प्रकारचे तेल किंवा लोशन लावणे टाळा. टेप कोरड्या त्वचेवर चांगली चिकटू शकते त्यामुळे त्याचा वापर करणे अधिक सोपे आहे आणि बॅकलेसमधून याचा आकारही दिसत नाही
बॅकलेस ब्रा

ब्रा घालताना काय काळजी घ्यावी
तुम्ही डीप नेकलाइन आणि बॅकलेस ड्रेस असलेली बॅकलेस ब्रा कॅरी करू शकता. बॅकलेस ब्रा मध्ये पारदर्शक आणि कमी कट बॅक बँड असतो जो ड्रेस घातल्यानंतरही दिसत नाही. तुम्ही या प्रकारची ब्रा बराच काळ वापरू शकता. यामुळे तुम्हाला कोणता त्रासही होत नाही आणि अधिक काळ योग्य पद्धतीने तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. तसंच तुमच्यासाठी कोणतीही ऑकवर्ड स्थितीही निर्माण होत नाही.
ब्रा वापरणे सोडले तर शरीरात कोणते बदल होतात जाणून घ्या…
ट्रान्सपरंट ब्रा
तुम्ही यासाठी ट्रान्सपरंट ब्रा देखील वापरू शकता. यामध्ये केवळ एकच समस्या आहे ती म्हणजे याचा पट्टा कोणी जवळ आल्यास दिसू शकतो. पण तुम्ही जर ट्रान्सपरंट ब्रा घालण्यास कम्फर्टेबल असाल तर त्याचा नक्कीच उपयोग करून घेऊ शकता. याचा पट्टा ट्रान्सपरंट असल्यामुळे बॅकलेस ड्रेस घालताना कोणतीही अडचण येत नाही.






