महिन्याभरात कमी होईल पोटावर वाढलेला चरबीचा घेर!
Health Care Tips: जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीराच्या कोणत्याही भागावर चरबीचा घेर वाढू लागतो, ज्यामुळे शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. वजन वाढल्यानंतर महिलांसह पुरुष देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने काहींना काही उपाय करणे, डाएट फॉलो करणे, व्यायाम करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. अनेक लोक सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी पाहून कोणताही डाएट प्लॅन फॉलो करतात. पण शरीराला सूट न होणारा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे शरीरात थकवा आणि इतर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी साधा सोपा डाएट प्लॅन सांगणार आहोत. हा डाएट फॉलो केल्यास महिन्याभरात तुमचे वाढलेले वजन कमी होईल.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमधे हातापायांना घाम का येतो? जाणून यामागील कारणे आणि घरगुती उपाय
वजन कमी करताना संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. याशिवाय आहारात शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या कार्यात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत. आहारामध्ये कमी कॅलरीज युक्त पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे पोट आणि शरीराच्या इतर भागांवर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल. याशिवाय आहारात शरीराला ऊर्जा मिळेल अशा पदार्थांचे सेवन करावे.
वाढलेले वजन कमी करताना संतुलित आहार घ्यावा. यामध्ये प्रथिने, कर्बोदके, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन करावे. प्रथिने शरीरातील स्नायू बळकट करतात. याशिवाय प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्यामुळे लवकर भूक लागत नाही. कार्बोहायड्रेट्सचे सेवन केल्यामुळे ऊर्जा मिळते आणि इन्सुलिनचे उत्पादन वाढण्यास मदत होते. आहारात कार्बोहायड्रेट्स कमी आणि आवश्यक असतील तरच खावीत.
फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो. हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, डाळी आणि काजू इत्यादी पदार्थांमध्ये फायबर भरपूर आढळून येते. फायबर शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. फायबरयुक्त पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
रात्रीच्या वेळी दात कशामुळे दुखतात? दातांचे दुखणे वाढल्यास ‘हे’ घरगुती उपाय करून तात्काळ मिळेल आराम
वजन कमी करताना शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी गुणकारी ठरतील अशाच पदार्थांचे सेवन करावे. अॅव्होकॅडो, नट्स, ऑलिव्ह ऑइल आणि फिश ऑइल सारखे निरोगी चरबीयुक्त पदार्थ शरीरासाठी आवश्यक आहेत. चरबीयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारते.