कोकणातील भयावह गोष्टी आपण ऐकूनच असाल. काही लोकांचे असे म्हणणे आहे की कोकण भर दिवसा जितका सुंदर दिसतो, तितकाच रात्री भयानक होऊन जातो. कोकणात पावला-पावलावर अशा अनेक गोष्टी ऐकण्यास येतात, जी आपल्या रात्रीची झोप क्षणार्धात उडवून टाकतात. पण या गोष्टींमध्ये एक नाव मात्र सगळ्याच गोष्टीत सर्रास ऐकायला येते ते म्हणजे 'राखणदार!'
'राखणदार' म्हणजे काय? जाणून घ्या. (फोटो सौजन्य - Social Media)

कोकण म्हणजे जणू स्वर्गच! कोकणाहून हिरवे काय? येथे आंबा, काजू, फणस तसेच नारळीच्या बागा सगळीकडेच पाहायला मिळतात. आता दिवसा त्यांची राखण करण्यासाठी माणूस असतो, पण रात्रीचं काय?

येथील लोकांचे असे म्हणणे आहे की, रात्रीच्या वेळी या बागांचे रक्षण 'राखणदार' करतो. राखणदार म्हणजे रक्षणकर्ता होय. राखण करणे हे राखणदाराचे काम असते.

पण हा राखणदार एक शक्ती असते जी लोकांना काही धोका असल्यास परतण्याचा इशारा करते. कोकणातल्या अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत जेव्हा रात्री अपरात्री कुणी बाहेर फिरत असेल तेव्हा तेथे धोका असल्यास राखणदार स्वतः येऊन इशारा करतो आणि आल्यावाटे परतण्यास सांगतो.

पण जर कुणी राखणदाराचे ऐकले नाही तर त्या व्यक्तीला शिक्षेस पात्र व्हावे लागते. तसेच चित्र विचित्र अदृश्य शक्तींचा सामना करावा लागतो.

घुंगराची काठी टेकत रात्री अपरात्री रानात वास करणारा 'राखणदार' तळ कोकणात आणि गोव्यात 'देवचार' या नावाने प्रसिद्ध आहे. कोकणात कोणतीही सुरुवात करताना राखणदाराचा मान द्यावा लागतो.






