असे म्हणतात की, कलाकृती ही समाजाचा आरसा आहे. अलीकडे तुम्ही पाहिले असेल की, आता अधिकतर चित्रपटांमध्ये हायलाइट होणारी गोष्ट म्हणजे पुरुषांचे अफेअर. त्यातही विवाहित पुरुषांचे अफेअर आणि त्यांचे इतर महिलांकडे आकर्षित होणे चित्रपटात अधिकतर दाखवले जाते. अशा या गोष्टी चित्रपटात आणि वेब सिरीजमध्ये दाखवल्या जातात, त्या जरी काल्पनिक असल्या तरी त्यातील प्रत्येक गोष्ट काल्पनिक आहे असे नाही. खऱ्या आयुष्यातही अशा अनेक गोष्टी घडत असतात.
विवाहित पुरुषांचे इतर स्त्रियांकडे आकर्षित होण्यामागे वैयक्तिक, भावनिक, मानसिक आणि कधी कधी सामाजिक करणे असू शकतात. आधुनिक जगाच्या ताणतणावामुळे आणि नात्यांमधील असमाधानतेमुळे अधिकतर पुरुष या मार्गाकडे वळत असतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला विवाहित पुरुष दुसऱ्या स्त्रियांकडे कोणत्या कारणास्तव आकर्षित होतात ते सांगणार आहोत.
हेदेखील वाचा – 100 वर्ष जगण्यासाठी जपानी लोक आहारात करतात या पेयाचा समावेश, म्हतारपणातही राहतात फिट
सध्याच्या युगात नवराच काय तर बायकोही काम करत असते. दोघेही मिळून आपल्या संसारचा गाडा चालवत असतात. अशात कामाच्या गडबडीत एकमेकांना कमी वेळ दिला जातो. बाळ झाल्यानंतर तर ही परिस्थिती आणखीनच बिघडू लागते. अनेकदा दोघांमध्ये भांडणे होऊ लागतात. दोघेही एकमेकांचा द्वेष करू लागतात. अशात जर दुसरी व्यक्त आपल्यासोबत गोड बोलत असेल, आपल्याला जिव्हाळा दाखवत असेल, आपल्याशी प्रेमाने बोलते असे पुरुषांना जाणवल्यास ते त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात.
अनेकदा बायकोकडून फसवणूक झाली की नात्यात दुरावा येऊ लागतो. अशावेळी आपल्या जोदीदारापासून दूर जावेसे वाटते मात्र समाजातील इज्जतीसाठी पुरुषांना संसार मोडता येत नाही. अशावेळी पुरुष फक्त समजाला दाखवण्यासाठी आपल्या त्या नात्यात राहू लागतात आणि स्वतःच सुख ते दुसऱ्या प्रामाणिक, शांत, प्रेमळ आणि त्यांना हव्या तशा स्त्रीमध्ये शोधू लागतात. कुठेतरी आयुष्यात मिळालेला धोकाच या गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे मानसिक शांततेसाठी ते दुसऱ्या स्त्रीचा आधार घेत असतात.
हेदेखील वाचा – Navratri Skincare: उपवासाच्या दिवशीही चेहरा राहील टवटवीत फक्त या घरगुती टोनरचा वापर करा
नवरा बायकोच्या नात्यात भावनिक समाधान असणे फार गरजेचे असते. विवाहामध्ये भावनिक आधार आणि संवाद असायला हवा. काहीवेळा संवादाची कमतरता आणि पार्टनरकडून भावनिक आधार न मिळाल्यामुळे पुरुष तो आधार इतर स्त्रियांकडून मिळवण्याचा प्रयत्न करू लागतात आणि यातूनच आकर्षण निर्माण होते.
सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे बाह्य आकर्षण फार वाढले आहे. सोशल मीडियाच्य माध्यमातून अन्य व्यक्तिबरोबर अगदी सहज संवाद साधला जातो. ज्यामुळे आकर्षण वाढण्याच्या संधी वाढल्या आहेत. पुरुषांना समाजात किंवा ऑनलाईन माध्यमातून इतर स्त्रियांशी संपर्क साधता येतो, जे नंतर आकर्षण निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.