फुफ्फुसांचा कर्करोग महिलांमध्ये वाढण्याचे प्रमाण अधिक (फोटो सौजन्य - iStock)
फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जागरूकता महिन्यात एक चिंताजनक बाब समोर येत आहे. अनेक महिला धूम्रपान न करताही फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त होत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पर्यावरणातील घटक, जीवनशैली आणि सुरुवातीची लक्षणे ओळखणे या गोष्टी प्रतिबंध आणि वेळेवर उपचारासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फुफ्फुसांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. महिलांनी या आजारापासून स्वतःचा बचाव कसा करावा हे जाणून घ्या.
भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. फुफ्फुसातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागल्याने त्याजागी ट्यूमर तयार होतो. जे श्वसनात अडथळा निर्माण करतात आणि शरीराच्या इतर भागांपर्यंत पसरू शकतात. धूम्रपान हे या आजाराचे मुख्य कारण असले तरी अनेक धूम्रपान न करणाऱ्या महिलांनाही हा आजार होत आहे. डॉ. तन्वी भट्ट, फुफ्फुसरोग तज्ज्ञ, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
5 सेकंदात Lungs Cancer ची पटणार ओळख, घरीच करा तपासणी; हाताची बोटं सांगतील लक्षणं
काय आहे कारण
यामागील कारणांमध्ये दीर्घकाळ प्रदूषित हवेचा संपर्क येतो. ज्यामुळे फुफ्फुसातील ऊतकांचे नुकसान होते. घरातील प्रदूषणही फुफ्फुसाच्या कर्करोगास कारणीभूत ठरते. बंद स्वयंपाकघरात होणारा धूर किंवा बायोमास इंधनाचा वापर यामुळेही फुफ्फुसाचा कर्करोग वाढू शकतो. दुसऱ्यांच्या धूम्रपानाच्या धुराचा (सेकंडहँड स्मोकचा) दीर्घ संपर्क फुफ्फुसातील पेशींमध्ये सूज आणि डीएनए चे नुकसान करतो. आनुवंशिक घटकही धूम्रपान न करणाऱ्या महिलांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढवतात.
अंदाजे ३०% धूम्रपान न करणाऱ्या महिलांनाही फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सतत खोकला येणे, श्वास घेताना त्रास होणे, छातीत वेदना किंवा जडपणा, थकवा जाणवणे आणि अचानक वजन कमी होणे ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचाराचा परिणाम चांगला मिळू शकतो. त्यामुळे जर सतत श्वसनासंबंधी त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.
कोणत्या थेरपी कराव्यात
या आजाराचा उपचार हा कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून असतो. यात ट्युमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीचा समावेश असतो. उपचाराची पद्धत डॉक्टर ठरवतात. त्यानुसार डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास रूग्ण कर्करोगातून लवकर बरा होऊ शकतो.
या व्यतिरिक्त धूम्रपान न करणाऱ्या महिलांमध्येही पर्यावरणीय आणि जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग वाढतो आहे. याबद्दल जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे. जसे की धूर आणि प्रदूषणापासून बचाव करणे. त्यामुळे आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्यांची काळजी घ्या. जागरूक राहा आणि फुफ्फुसांचे रक्षण करा.
तरुणांमध्ये झपाट्याने वाढत आहे Lung Cancer चा धोका; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि कारणे
Ans: फुफ्फुसाचा कर्करोग किती वेगाने पसरतो हे अनिश्चित आहे आणि ते अनेक घटकांवर अवलंबून असते, परंतु मेटास्टेसाइज होण्यासाठी (शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्यासाठी) सामान्यतः 6 ते 12 महिने लागतात. कर्करोगाचा विकास दर त्याच्या प्रकारावर (जसे की लहान पेशी विरुद्ध लहान नसलेले पेशी) आणि वैयक्तिक आरोग्य घटकांवर अवलंबून असतो.
Ans: होय, फुफ्फुसाचा कर्करोग बरा होऊ शकतो, विशेषतः जर लवकर निदान झाले तर. सुरुवातीच्या टप्प्यात, शस्त्रक्रिया किंवा लक्ष्यित रेडिएशन थेरपीसारख्या उपचारांमुळे कर्करोग पूर्णपणे काढून टाकता येतो. जर कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरला असेल तर त्यावर उपचार करणे कठीण होऊ शकते, परंतु केमोथेरपी आणि इम्युनोथेरपीसारख्या आधुनिक उपचारांमुळे ते नियंत्रित होऊ शकते आणि रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते






