फोटो सौजन्य: iStock
काही फळांचे रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात. पण तुम्हाला माहित आहे का की सर्व फळांचे रस एकत्र करून पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते? होय, हे खरे आहे! काही फळांचे कॉम्बिनेशन शरीरातील पोषक तत्त्वांच्या शोषणावर परिणाम करू शकते, ज्यामुळे पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर अशा मिश्रणामुळे अॅलर्जी किंवा विषारी परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे कोणते फळांचे रस एकत्र पिणे टाळावे, याबद्दल आज आपण आवश्यक माहिती जाणून घेऊया.
संत्र्याच्या आंबटपणामुळे ते दुधातील प्रथिनांशी रिएक्शन करते, ज्यामुळे पचन प्रक्रिया बिघडू शकते. याचा परिणाम गॅस, जडपणा आणि अॅसिडिटी यासारख्या समस्यांमध्ये होतो.
सफरचंद आणि संत्री दोघेही आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, त्यांचा रस एकत्र प्यायल्यास पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. हे मिश्रण गॅस आणि अॅसिडिटीसारख्या त्रासांना कारणीभूत ठरू शकते.
पपईतील एंझाइम आणि लिंबाच्या अॅसिडची प्रतिक्रिया होऊन पोटात जळजळ आणि डायरियासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स आणि केळीतील स्टार्च एकत्र आल्याने पचनक्रिया बिघडू शकते, ज्यामुळे शरीरात जडपणा आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
टरबूजात भरपूर पाणी असते, तर केळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. दोन्ही एकत्र घेतल्याने पचनक्रिया मंदावते, परिणामी गॅस, अॅसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.
सफरचंद आणि लिंबू दोन्ही आम्लयुक्त असल्याने त्यांचा एकत्रित परिणाम पचनक्रियेवर परिणाम करतो, ज्यामुळे गॅस आणि अॅसिडिटी होऊ शकते.
अननसातील ब्रोमेलेन एंझाइम दुधाशी प्रतिक्रिया करून विषारी प्रभाव निर्माण करू शकते, ज्यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि मळमळ जाणवू शकते.
स्ट्रॉबेरी, द्राक्षे यांसारखी अॅसिडिक फळे आणि डाळिंब, सफरचंद, पीच यांसारखी सब-अॅसिडिक फळे केळी किंवा मनुका यासारख्या गोड फळांसोबत खाणे टाळावे, कारण यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.






