फोटो सौजन्य: Freepik
एक चांगली झोप फक्त आपल्याला ताजेतवाने करत नाही तर निरोगी सुद्धा ठेवते. दिवसभर काम केल्यानंतर आपले शरीर थकून जाते व आपल्याला आस लागते ती सुखाच्या झोपेची. पण हीच सुखाची झोप एक चुकीच्या सवयीमुळे अनेक आजराना आमंत्रण देऊ शकते.
आपल्यापैकी अनेक जणांना एक विशिष्ट पद्धतीने झोपलो नाही की झोप येत नाही. पण चुकीच्या पद्धतीने झोपण्याचे अनेक तोटे असू शकतात. त्यामुळेच योग्य पद्धतीने झोपण्याची पद्धत तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
पाठदुखी: चुकीच्या पद्धतीने झोपल्याने पाठीच्या कण्यावर दबाव येतो, ज्यामुळे पाठदुखी होऊ शकते.
मान दुखणे: जर झोपताना तुम्ही तुमचं डोकं व्यवस्थित ठेवलं नाही तर यामुळे तुमची मान दुखू शकते.
श्वास घेण्यात समस्या: पोटावर झोपल्याने फुफ्फुसांवर दबाव येतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि घोरण्याची शक्यता वाढते.
ॲसिड रिफ्लक्स: चुकीच्या पद्धतीने झोपल्याने पोटात ॲसिडिटी वाढते, ज्यामुळे ॲसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते. यामुळे, पोटातील ऍसिड अन्ननलिकेच्या आत प्रवेश करते. यामुळे जळजळ होते व आंबट ढेकर येते.
हृदयविकाराचा धोका : चुकीच्या पद्धतीने झोपल्याने हृदयाचा त्रास वाढू शकतो. यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
पाठीवर झोपा: झोपण्याचा हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. यामुळे मणक्याला योग्य आधार मिळतो आणि पाठदुखी व मानदुखी टाळता येते.
पलंगावर योग्य उशीचा वापर: झोपण्याची उशी खूप उंच किंवा खूप कमी नसावी. हे डोके आणि मानेला योग्य आधार देईल याची खात्री करणे आवश्यक आहे.
उजव्या बाजूला झोपणे: या पद्धतीमुळे हृदयावर आणि पचनसंस्थेवर कमी दाब पडतो. तसेच ॲसिड रिफ्लक्स देखील कमी होतो.






