झिंकच्या कमतरतेसाठी कोणते पदार्थ खावेत
शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी अनेक प्रकारची खनिजे आणि जीवनसत्त्वे आवश्यक असतात. यापैकी, Zinc हेदेखील एक आवश्यक खनिज आहे परंतु ते रोजच्या आहारात फारच कमी प्रमाणात असते. त्वचा आणि जखमांवर उपचार करण्यासोबतच, झिंक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. हे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि साखरेची पातळी देखील नियंत्रित करते.
डॉ. निधी धवन, एचओडी डायटेटिक्स, सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दिल्ली यांच्या मते, झिंकच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. शरीरात झिंकच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, भूक कमी लागणे, मानसिक आरोग्यावर परिणाम होणे, वास आणि चव कमी होणे, केस गळणे, वारंवार जुलाब होणे, वजन कमी होणे ही लक्षणे दिसू शकतात.
अंडे ठरू शकते उत्तम
अंड्याच्या पिवळा बलक ठरेल फायदेशीर
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही लोकांना अंड्याचा बलक त्याचे फायदे जाणून घेतल्याशिवाय खाणे आवडते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये मुबलक प्रमाणात झिंक असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन बी 12, थायामिन, व्हिटॅमिन बी 6, फॉस्फरस, कॅल्शियम आणि फोलेट सारखे अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.
दालचिनीमध्ये दडलंय निरोगी राहण्याचं रहस्य, असा वापर करा दालचिनीचा
शेंगदाण्याचे करा सेवन
शेंगदाणा ठरेल फायदेशीर
शरीरातील झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात शेंगदाण्यांचा समावेश केला पाहिजे. शेंगदाण्यामध्ये फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम आणि आयरन मुबलक प्रमाणात असते, जे आपल्या शरीरातील झिंकची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते. तुम्ही आपल्या आहारामध्ये भाजी, सलाड वा आमटीमध्ये शेंगदाण्याचा समावेश करून घ्यावा.
नट्स आणि बियांचा करा वापर
झिंकची कमतरता असल्यास खा नट्स आणि बिया
नट्समध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. काजू, बदाम आणि शेंगदाणे यांसारखे नट्स झिंकचे उत्कृष्ट स्रोत आहेत. त्यामध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि निरोगी चरबी असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. जर तुम्हाला शरीरातील झिंकचे प्रमाण वाढवायचे असेल तर काजूचे सेवन नक्की करा. हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठीही हे फायदेशीर आहे. तर मसूर, राजमा, हरभरा आणि इतर कडधान्यांमध्येदेखील झिंकचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्यांचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
भोपळ्याच्या बिया उत्तम स्रोत
भोपळ्याच्या बियांचा करा वापर
भोपळ्याच्या बिया देखील झिंकच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहेत. हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत झिंकच्या कमतरतेवर मात करण्यासाठी दररोज मूठभर भोपळ्याच्या बियांचे सेवन केले जाऊ शकते
अतिरिक्त झिंक पदार्थांमुळे होऊ शकतात 5 समस्या, रोज किती खावे?
अन्य आहार स्रोत
झिंकसाठी अन्य पदार्थ कोणते खावेत
तुम्ही तुमच्या आहारात चणे, दही, साधे ओट्सचे जाडे भरडे पीठ, फोर्टिफाइड ब्रेकफास्ट, बीफ चक रोस्ट, ऑयस्टर, बेक्ड बीन्स आणि दूध यांचा समावेश केल्यास तुमच्या शरीराला पुरेशा प्रमाणात झिंक मिळण्याची शक्यता असते. जर तुम्हाला झिंकची कमतरता जाणवत असेल तर या सर्व झिंक युक्त गोष्टींचे सेवन वाढवण्याचा प्रयत्न करा. हे अत्यंत नैसर्गिक पदार्थ आहेत ज्यामुळे तुमच्या शरीराला योग्य जिंक मिळू शकते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.