मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) ४० हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बंडखोरी करून भाजपच्या (BJP) मदतीने सरकार स्थापन केले आहे. त्यातच शिवसेनेचे खासदारदेखील (Shivsena Member Of Parliament) एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे समजते. आज मातोश्रीवर (Matoshri) सुरू झालेल्या बैठकीला तब्बल १० खासदारांनी दांडी (Absent) मारली आहे.
मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारदेखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याकडे शिवसेनेच्या खासदारांचा कल आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवरील बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते. मात्र या बैठकीला लोकसभेच्या १० खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.
बैठकीला उपस्थित खासदार
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला गजानन कीर्तिकर (वायव्य मुंबई), अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), विनायक राऊत (रत्नागिरी- सिंधुदुर्ग), धैर्यशील माने (हातकणंगले), हेमंत गोडसे (नाशिक), राहुल शेवाले (दक्षिण मध्य मुंबई), श्रीरंग बारणे (मावळ), प्रताप जाधव (बुलढाणा), सदाशिव लोखंडे (शिर्डी); तर, राज्यसभेचे संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी हे खासदार उपस्थित होते.