रायगड : रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज ६ जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे.
शिवभक्तांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण असून, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झालं असल्याचं पाहायला मिळत आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नेतेगण उपस्थित झाले आहेत.