सातारा : गोजेगाव येथील एका शिवारात लागलेल्या आगीत सुमारे ६० एकर क्षेत्रात लागवड केलेला ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे ८० शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग विझवण्यासाठी पाणीच मिळू शकले नाही
या परिसरात विद्युत पूरवठा बंद असल्याने आग विझवण्यासाठी शेतक-यांना विहिरीचे पाणीच मिळू शकले नाही. हा ऊस अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या अखत्यारीत येताे.
[read_also content=”वीज कापायला आलात तर शेतकरी दांडक्यानं सोलून काढेल; सदाभाऊ खाेत यांचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/if-the-power-goes-out-the-farmer-will-peel-it-off-with-a-stick-warning-of-sadabhau-khaet-nrdm-261354.html”]
दरम्यान अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी जळालेल्या ऊसाची कोणतीही कपात न करता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.