सौजन्य - सोशल मिडीया
नांदेड : राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. सध्या नेांदेडच्या राजकारणात असचं काहीसा प्रत्यय पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे विश्वासू असलेले माजी पालकमंत्री डी. पी सावंत यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बुधवारी त्यांनी नांदेड उत्तरमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडे अर्ज देखील दाखल केला आहे. डी. पी. सावंत यांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवय्या उचवल्या आहेत.
अशोक चव्हाण यांची साथ देणारे अनेकजण आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची साथ सोडत आहेत. अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र आणि माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. शिवाय भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांच्यासोबत गेलेले माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे.
आता डी पी सावंत यांनी नांदेड उत्तर मधून काँगेसकडे उमेदवारी मागितली असून जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयात त्यांनी अर्ज दाखल केलाय. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी आणि नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता अनेक जन त्यांच्यापासून दूर होत आहेत. भाजपमध्ये गेलेले माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून थेट उमेदवारीच मागितली आहे. दरम्यान मी काँग्रेसमध्येच होतो, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचे काम करील अशी प्रतिक्रिया डी. पी. सावंत यांनी दिली.
काँग्रेसमध्ये इच्छूकांची संख्या वाढली
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे. अनेकजण काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे मागणी करत आहेत. तर दुसरीकडे चव्हाण समर्थक देखील काँग्रेसमध्ये घरवापसी करताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर शिंदे यांनी काल भाजप सोडून काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. अशोक यांचे कट्टर समर्थक तथा माजी महापौर जयश्री पावडे यांनी देखील काँग्रेस उमेदवारी मागितली आहे.