डोंबिवली – अमजद खान : रात्री अडीच वाजता काही तरुण धारदार शस्त्र आणि लाकडी दांडके घेऊन आले. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत बुलडोझरही होता. लोकांना जबरदस्तीने घराबाहेर काढून घरे आणि दुकाने तोडून कारवाई करण्यात आली. सात कुटुंबे बेघर झाली आहेत. स्वतःला महापालिका कर्मचारी सांगून हे कृत्य केले असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस आणि बिल्डर लॉबी संगनमत करुन गुंडगिरी करुन आम्हाला उद्धवस्त केल्याचा आरोप पिडीत कुंटुंबांनी केला आहे. या प्रकरणी आमच्याकडे तक्रार आली. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे पेलिसांचे म्हणणे आहे.
डोंबिवली पूर्वेतील टाटा लाईन परिसरात लोक आपल्या घरात झोपले होते. रात्री अडीच वाजताच्या सुमारास जोरजाेरांनी लोक बोलत होते. त्यांचा आवाज ऐकून काही लोक घराबाहेर पडले. लोकांनी पाहिले की, समोरच्या व्यक्तीच्या हातात धारदार शस्त्रे आणि लाकडी दांडके होती. त्यांच्यासोबत एक बुलडोझर त्यांच्यासोबत होता. या लोकांनी घरात झोपलेल्या लोकांना जबरस्तीने घराबाहेर काढण्यास सुरुवात केली. बघता बघता सात कुटुंबियाना घराबाहेर काढून त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवला. त्यामुळे एकच गेांधळ आणि विरोध झाला.
त्याठिकाणी रामनगर पोलीस त्याठिकाणी पोहचले. पिडीत कुटुंबातील व्यक्ती नंदू माने यांचा आरोप आहे की, शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या आशीर्वादाने शार्दूल पाटील नावाच्या व्यक्तीने गुंड पाठवून हे अन्यायकारक कृत्य केले आहे. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही बेघर झालो आहोत. कुठे जाणार काय करणार. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणेश जवादवाड यांचे म्हणणे आहे की, आमच्याकडे तक्रार आली आहे. त्याची चौकशी केली
जाणार आहे.