A Mere Show Of Action By The Traffic Police Action Against 26 Minor Drivers In 5 Months Nrdm
वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा नुसताच दिखावा; 5 महिन्यात 26 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई
पुणे शहरात एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव चारचाकीने धडक देऊन दोघांचा जीव घेतल्यानंतर शहरातील अल्पवयीन वाहन चालक आणि दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिसांचा पाच महिन्यांचा लेखाजोखा काढल्यानंतर या कारवाईचा केवळ दिखावाच असल्याचे वास्तव दिसत आहे.
पुणे : पुणे शहरात एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव चारचाकीने धडक देऊन दोघांचा जीव घेतल्यानंतर शहरातील अल्पवयीन वाहन चालक आणि दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिसांचा पाच महिन्यांचा लेखाजोखा काढल्यानंतर या कारवाईचा केवळ दिखावाच असल्याचे वास्तव दिसत आहे.
पाच महिन्यात पुर्ण शहरात पोलिसांना फक्त २६ अल्पवयीन मुल वाहन चालविताना मिळाली आहेत. तर, ४७९ म्हणजे पावणे पाचशे जणांवर मद्य प्राशनकरून वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली आहे. पोलिसांनी यांच्यावर कारवाईकरून दंड वसूल केला आहे. इतकीच काय ती वाहतूक पोलिसांची कारवाई आहे. परंतु, शहराच्या गल्लीबोळात दिवसा अन् रात्रीही अल्पवयीन पोरं ट्रिपल शिट फिरत असताना पाहिला मिळतात, इतकच नाही तर टवाळखोर पोर सरास दारू पिऊन गाड्या चालवित असल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे.
शहरात वाहतूकीच्या कोंडीने पुणेकर हैराण असतात. त्यात बेशिस्त वाहन चालकांचा त्रास असतो. कमी म्हणून की काय आता शहरात वाढत चालेल्या मद्यपी वाहन चालक आणि अल्पवयीन मुलांच्या वाहन चालविण्याचा त्रास होऊ लागला आहे. हा फक्त त्रास नाही, तर तो पुणेकरांच्या जिवावर बेतत असल्याचे देखील वेळोवेळी दिसत आहे.
शनिवारी कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाताने ही बाब पुन्हा एकदा प्रकार्षाने दिसत आहे. या अपघाताने पुणेकरांत प्रचंड राग आणि संतापाची लाट पसरली आहे. परंतु, वाहतूक पोलिसांच्या एकूण कारवाईबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाहतूक पोलिसांची नियमन कारवाई वर्षाला कोटींच्या कोटी उड्डाणे घेत आहे. पण, परिणामी पुणेकरांना वाहतूक कोंडी मुक्त आणि या बेशिस्त वाहन चालकांमधून त्रास मात्र काही मिळत नसल्याचे वास्तव आहे.
पुणेकरांच्या सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही लावले, पण, त्याचा सर्वाधिक उपयोग हा वाहतूक पोलिसांना होतो. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक पोलीस कारवाईवर भर देत आहेत. पोलीस रस्त्यावर उभा राहिलेच तर घोळकाकरून दंड वसूली करण्यात मग्न असतात. त्यात अल्पवयीन अन् एखाद दुसरा मद्यपी त्यांच्या हाती लागलाच तर थातूर माथूर कारवाई करून पाठिमागच्या दारातून त्याला सोडून दिले जात असल्याचे यापुर्वी अनेक वेळा समोर आले आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलांना अन् मद्यपींच्या मनात पोलिसांबाबत आणि पर्यायाने कायद्याचा धाक राहत नाही.
शहराच्या उपनगरांचा भाग अशा वाहन चालकांनी घेरलेला असतो. त्यासोबतच गेल्या काही वर्षात नव्याने उदयास आलेल्या पब कल्चरमध्ये कोरेगांव पार्क, मुंढवा, विमानतळ, येरवडा, बंडगार्डन अशा भागात शुक्रवार आणि शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी असते. कशीही वाहने लावून हे बड्या दिवट्यांची पोरं नगानाच करतात, परंतु, त्यांच्यावर कारवाई किती आणि काय झाली हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे अशा घटनांना देखील वाहतूक पोलीस तितताकच जबाबदार म्हणता येईल.
गुन्हेगारांवर कारवाई का होत नाही..!
शहरात गुन्हेगारीत शिरलेल्या अल्पवयीनांचा रूद्रअवतार पाहिचा असल्यास रात्री अन् घटनेच्या पुर्वी दिसेल. अनेकवेळा हे मद्य पिलेले तर असतातच पण वाहन अत्यंत बेधडक वाहन चालवत गोंधळ घालतात. ट्रिपलशिट यायची त्यांची स्टाईल असते. मग, अशा प्रकरणात पोलीस त्यांच्यावर मद्यपीची, मोटार वाहन कायद्याची, त्यांना दारू मिळते अशा ठिकाणाची कारवाई का करत नाहीत, असाही प्रश्न आहे.
अल्पवयीन मुलांना वाहने देणाऱ्या पालकांवर कारवाई झाल्याशिवाय हा पायंडा बदलणार नाही आणि शिस्त देखील लागणार नाही, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. खासगी क्लास, कॉलेजमध्ये येणारे मुलं सरास दुचाकी वापरतात, त्यांच्याकडे वाहन परवाना नसतोच पण बहुंताश अल्पवयीन असतात. त्यामुळे अशा ठिकाणी कारवाई होणे अपेक्षित आहे.
Web Title: A mere show of action by the traffic police action against 26 minor drivers in 5 months nrdm