नवी मुंबई : संदेश पाटील वय ४० वर्ष हा इसम पीडितेच्या शेजारी राहिला असल्याने पीडित अल्पवयीन मुलगी ही संदेश पाटील यांच्या घरी खेळण्यासाठी येत जात होती. पीडीतेची आई घरातील कपड्यांना घडी घालत असताना पीडित मुलगीही शेजारील संदेश पाटील यांच्या घरी बुद्धिबळ खेळण्यासाठी गेली होती. संदेश यांनी तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिचे कपडे काढून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन संदेश या गोष्टी करत होता.
यापूर्वी देखील अल्पवयीन पिडिता पहिलीमध्ये शिकत असताना संदेश पाटील यांनी त्याच्या घरात कोणीही नसल्याचे बघून पीडितेला त्याच्या घरी बोलवून घेतलं आणि बेडरूममध्ये घेऊन जाऊन पीडितेला अश्लील चित्र व व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत शारीरिक अत्याचार केले. हे सिक्रेट कोणाला न सांगण्याचे पीडितला सांगितले. सदरचा संपूर्ण प्रकार अल्पवयीन पीडितेच्या आईला समजल्यावर पीडितेच्या आईने एनआरआय पोलीस ठाणे गाठले. संदेश पाटील हा ४० वर्षांचा होता, उलवे येथे राहणार होता यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
एनआरआय पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संदेश पाटील या व्यक्तीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास एनआरआय पोलीस करत आहेत.