अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या (Woman Harassment) घटना लक्षणीय आहेत. पुण्यात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्ये भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल (Crime Video) होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहर मध्ये भर रस्त्यात मुलींची छेडछाड केली जात असल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. भरदिवसा रस्त्यात मुलींना असा त्रास देण्याचा प्रकार गंभीर आणि मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या व्हिडीओची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलिस… pic.twitter.com/DgYgxIYUTp
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 3, 2023
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकाराची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेतली असून कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत.
रुपाली चाकणकर यांनी केलं ट्विट अन् म्हटलं…
या घटनेचा व्हिडिओ चाकणकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहर मध्ये भर रस्त्यात मुलींची छेडछाड केली जात असल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. भरदिवसा रस्त्यात मुलींना असा त्रास देण्याचा प्रकार गंभीर आणि मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या व्हिडीओची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलिस अधीक्षक, अहमदनगर यांना तातडीने चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.