• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Action To Be Taken Against Sellers And Dealers While Nylon Manja Are Banned

makar sankranti 2025 : नायलॉनचा मांजा विकाल तर याद राखा! पुणे पोलिसांची विक्रेत्यासह डीलरलाही तंबी

देशहासह पुण्यामध्ये मकर संक्रात सणाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. मकर संक्रांतीसाठी पतंग आणि मांजाने बाजारपेठा फुलल्या आहेत. मात्र बाजारामध्ये धारदार नायलॉनचा मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 11, 2025 | 04:46 PM
हेल्मेट, स्कार्फमुळे वाचला 'तिचा' जीव

File Photo : Nylon Manja

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुण्यासह देशभरामध्ये मकर संक्रांतीची जोरदार तयारी सुरु आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रंगीबेरंगी पतंग उडवले जातात. त्याचबरोबर एकमेकांच्या पतंगी कापण्याची स्पर्धा देखील लागलेली आहे. मात्र या स्पर्धेच्या इर्षेमध्ये नायलॉन मांजा वापरला जातो. नायलॉन मांज्यामुळे अनेक पक्ष्यांचे आणि गाडी चालवणाऱ्या लोकांचे प्राण जात आहे. पुण्यामध्ये देखील अशाप्रकारे नायलॉनचा मांजा वापरला जात असून त्याच्या विक्रीवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुणे पोलीस मांजा विक्रेत्यासह त्याची डील करणाऱ्या डिलरवर देखील लक्ष ठेवून आहे.

धारदार नायलॉनच्या मांजाचा जीवघेणा खेळ थांबविण्यासाठी मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्याचा आक्रमक पवित्रा पुणे पोलिसांनी घेतला आहे.  शहरात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात नायलॉन मांजामुळे दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. यापूर्वीही या धारदार मांजामुळे अनेक नागरिक जखमी झाल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही शहरात अशा मांजाची विक्री होत असल्याचे प्रकार पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर आला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

यापुढे नायलॉनचा मांजा विकणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी कडक पाऊले उचलली असून आता नायलॉन मांजा विक्री करण्याबरोबर, मांजा विक्री करणारे डिलर आणि असा मांजा उत्पादन करणारे यांच्यावर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे अशी अवैध मांजा विक्री व उत्पादन पोलिसांच्या रडारवर आले आहे.

पुणे शहरातील आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दरवर्षी हा नायलॉन मांजा बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर येथे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र कारवाई केवळ मांजा विक्रेता करणार्‍या दुकानावर होते. परंतु, मांजाची डिलर आणि मांजाचे उत्पादन करणारे याला कारणीभूत ठरतात त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. त्यामुळे मांजाचे डिलर आणि उत्पादन कर्त्यांवर कारवाई केली जाणार आहे.

2017 पासून हानिकारक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. बारीक काचेचा लेप असलेला मांजा शहराच्या अनेक दुकानांमध्ये सर्रास विकला जात आहे. पुणे शहरात गेल्या पाच वर्षांत नायलॉन मांजाचे किमान 16 गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. 2023 मध्ये 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 2024 मध्ये पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत. तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शहरात अशा असंख्य घटना घडल्या आहेत मात्र पुढे येऊन तक्रारी न दिल्याचीही उदाहरणे आहेत.

क्राईम न्यूज वाचा एका क्लिकवर

पतंग काटा काटीच्या स्पर्धेसाठी शहरात प्रामुख्याने डिसेंबर महिन्यापासूनच नायलॉन मांजा विक्रीला सुरुवात होते. चोरट्या पध्दतीने हा मांजा बाजारात पुरविला जातो. हा मांजा पतंग उडविण्यासाठी व त्यातून आनंद घेण्यासाठी नाही तर आकाशात उडणार्‍या पतंग काटाकाटीच्या स्पर्धेसाठी वापरला जातो. त्यासाठी पतंग उडविणार्‍यांकडून दुसर्‍यांच्या पतंग कापण्यासाठी अधिक धारदार मांजाचा शोध घेतला जातो. या काटाकाटीच्या स्पर्धेतच अशा नायलॉन मांजा बाजारात येत असतो. मुळात ही काटाकाटीची स्पर्धाच संपली तर असा धारदार मांजाही बाजारात येण्यास आपोआप मज्जाव येईल.

“मकरसंक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने पतंग उडवताना या धारदार धाग्याचा वापर केला जातो. त्यानंतर अडकलेला मांडा हा झाडांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला अडकला जातो. यामुळे अनेक नागरिक, प्रवासी, पक्षी आणि दुचाकी चालक गंभीर जखमी होतात. तसेच अनेकांचे प्राण देखील जातात. याचा सर्वाधित फटका पशू पक्षांना बसला आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही चोरून मांजा विक्री करणारे, मांजाची डिलींग करणार्‍यांवर व मांजाचे उत्पादन करणार्‍यांपर्यंत पोहचून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.” अशी माहिती पुणे शहराचे अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.

Web Title: Action to be taken against sellers and dealers while nylon manja are banned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • makar sankranti 2025
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Railway Megablock: मुंबई-पुणे मार्गावर तब्बल 19 तासांचा मेगाब्लॉक; ‘या’ एक्स्प्रेस रद्द
1

Railway Megablock: मुंबई-पुणे मार्गावर तब्बल 19 तासांचा मेगाब्लॉक; ‘या’ एक्स्प्रेस रद्द

तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार
2

तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

पुण्यात खळबळ! NDA मध्ये विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून केली आत्महत्या
3

पुण्यात खळबळ! NDA मध्ये विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून केली आत्महत्या

चौघांनी तरुणाला भररस्त्यात गाठले, डोक्यात बाटली घातली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

चौघांनी तरुणाला भररस्त्यात गाठले, डोक्यात बाटली घातली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rajsthan Crime News: पाकिस्तानी  ISIसाठी गुप्तहेरी; राजस्थान गुप्तचर विभागाकडून मंगत सिंगला अटक

Rajsthan Crime News: पाकिस्तानी ISIसाठी गुप्तहेरी; राजस्थान गुप्तचर विभागाकडून मंगत सिंगला अटक

Tula Sankranti: तूळ संक्रातीच्या वेळी तयार होत आहे अद्भुत शुभ योग, या राशीच्या लोकांना मिळतील सूर्यदेवाचे आशीर्वाद

Tula Sankranti: तूळ संक्रातीच्या वेळी तयार होत आहे अद्भुत शुभ योग, या राशीच्या लोकांना मिळतील सूर्यदेवाचे आशीर्वाद

थंडीमध्ये त्वचा खूप जास्त ड्राय होते? मग ‘या’ डाळीचा वापर करून घरीच तयार करा सुगंधी उटणं, चेहऱ्यावर येईल ग्लो

थंडीमध्ये त्वचा खूप जास्त ड्राय होते? मग ‘या’ डाळीचा वापर करून घरीच तयार करा सुगंधी उटणं, चेहऱ्यावर येईल ग्लो

Buldhana Crime: भाजीपाल्याच्या किरकोळ वादातून गरोदर महिलेसह कुटुंबाला मारहाण; बाळाचा मृत्यू

Buldhana Crime: भाजीपाल्याच्या किरकोळ वादातून गरोदर महिलेसह कुटुंबाला मारहाण; बाळाचा मृत्यू

Karjat News : कर्जतमध्ये दोन गोवंश जनावरांची कत्तल, 3 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल

Karjat News : कर्जतमध्ये दोन गोवंश जनावरांची कत्तल, 3 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल

रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी लावले हिटमॅनच्या नावाचे नारे! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral

रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी लावले हिटमॅनच्या नावाचे नारे! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral

Amitabh Bachchan यांनी 83 व्या वाढदिवशी स्वतःलाच दिले करोडो रुपयांचे गिफ्ट, पहाल तर डोळे विस्फारतील

Amitabh Bachchan यांनी 83 व्या वाढदिवशी स्वतःलाच दिले करोडो रुपयांचे गिफ्ट, पहाल तर डोळे विस्फारतील

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Latur News :  मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Latur News : मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.