पुणे : माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील रासपच्या जनस्वराज्य यात्रेत कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केले आहे.
शहराध्यक्ष बालाजी पवार यावेळी बोलताना म्हणाले की, महादेव जानकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित जनस्वराज यात्रा माढा लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक १० जुलै रोजी सकाळी ८ वाजता पंढरपूर येथून सुरू करण्यात येणार आहे, तरी राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सूचना आहे, आपण आपल्या भागातील जास्तीत जास्त गाड्या आणि कार्यकर्ते घेऊन पंढरपूर येथे वेळेवर उपस्थित रहावे.
जन स्वराज्य यात्रेचा मार्ग कसा आहे ?
पंढरपूर- करकंब – तुळशी- अरण- मोडनिंब- शेटफळ – भुताष्टे (जेवण) -कुर्डुवाडी – कव्हे – रोपळे – सालसे – पांडे – करमाळा – जेऊर – शेलगाव- पांगरे -कंदर- फुटजवळगाव – अकोले – टेंभुर्णी-शेवरे – नरसिंहपूर- संगम- माळीनगर- अकलूज- माळशिरस- मोटेवाडी – तरंगफळ – निमगाव – पिलीव -साळमुख – शिवणे – सांगोला (मुक्काम).
मंगळवार दि ११जुलै २०२३ – (सकाळी ८ वा सुरूवात) सांगोला – नाझरे -माडग्याळ-आटपाडी – दिघंची-लिंगीवरे- पळसवडे – देवापूर -वीरकरवाडी -म्हसवड (जेवण) – गोंदावले-दहीवडी -वडूज- खटाव – पुसेगाव – बुध – लालगुण – डिस्कळ -मोळ ताथवडा -ढवळ – वाखरी – फलटण समारोप सभा होणार आहे.