कल्याण - खासदार श्रीकांत शिंदे
कल्याण : कल्याणमधील आचारी अत्रे रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे , खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवला, तो नॅरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही. संविधान खतरे मे संविधान बचाव अशा सगळ्या खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून हे एकगट्टा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं. त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला असेल. मात्र ही टेम्परेरी गोष्ट आहे, ही पर्मनंट अरेंजमेंट नाही इतर लोकांच्या दिशाभूल करून लोकांचा मतदान मिळवले असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमध्ये केला.
या कार्यक्रमाला सुनील तटकरे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत .यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शिवसेना पदाधिकारी निलेश शिंदे, शिवसेना माजी नगरसेवक मयूर पाटील शिवसेना पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी, लोकांच्या दिशाभूल एकदा करू शकतात वारंवार दिशाभूल होत नसते. येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येईल असा विश्वास व्यक्त केला.
आदित्य ठाकरेंच्या संदर्भात म्हणाले की, वरळी मतदारसंघात 40 हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असं त्यांना वाटत होतं. मात्र लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली. वरळी मतदारसंघात फक्त ६ हजार मताधिक्य आलं. त्यांना वाटत होतं मराठी माणूस त्यांच्यासोबत आहे, मात्र मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या बाळासाहेबांच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी मतपेटीतून दाखवून दिलं. म्हणून 19% जे मतदान शिवसेनेला होत होतं त्यातील साडेचौदा टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला धनुष्य बाणाला पडलं असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्याच लोकांनी कुठे कुठे पैसे वाटण्याचे काम चालू आहे असा पलटवार केला.
वरळीत कमल फुलणार नाही असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी पुढच्या वेळेस आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की नाही तोच एक मोठा प्रश्न आहे, नाहीतर घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पहावं लागणार असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.