Administration In Pune Active Action Taken On 30 Hoardings So Far Nrdm
पुण्यात प्रशासन ‘अॅक्टीव माेड’ वर, आतापर्यंत ३० हाेर्डींगवर हातोडा; तब्बल ‘इतक्या’ जणांना बजाविल्या नाेटीस
पुणे शहरातील अनधिकृत हाेर्डींगवर हाताेडा मारण्यास सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी १८ हाेर्डींग काढले. तर धाेकादायक असलेल्या १८ हाेर्डींग मालकांना नाेटीस पाठविण्यात आल्या आहेत. एकीकडे प्रशासन ‘अॅक्टीव माेड’ मध्ये आले असताना आता त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जाऊ शकताे.
पुणे : पुणे शहरातील अनधिकृत हाेर्डींगवर हाताेडा मारण्यास सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी १८ हाेर्डींग काढले. तर धाेकादायक असलेल्या १८ हाेर्डींग मालकांना नाेटीस पाठविण्यात आल्या आहेत. एकीकडे प्रशासन ‘अॅक्टीव माेड’ मध्ये आले असताना आता त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जाऊ शकताे.
मुंबईतील घाटकाेपर येथील हाेर्डींग दुघर्टनेच्या पार्श्वभुमीवर पुणे महापािलकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने कारवाई सुरु केली आहे. तसेच दाेन दिवसांपुर्वी माेशी येथे एक हाेर्डींग काेसळण्याची घटना घडली. अशावेळीच महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावळच एक हाेर्डींग एका रात्रीत उभे राहीले हाेते. यावरून महापालिका प्रशासनावर जाेरदार टिका झाल्यानंतर ते हाेर्डींग शुक्रवारी (दि. १८) काढून टाकले. या हाेर्डींगची परवानगी रद्द करण्याची प्रक्रीया खातेस्तरावर सुरु करण्यात आल्याची माहीती प्रशासनाने दिली.
महापालिका आयुक्त राजेंद्र भाेसले यांनी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या हद्दीतील सर्व हाेर्डींगची पाहणी केली. तसेच धाेकादायक हाेर्डींग धारकाला नाेटीस बजाविणे आणि अनधिकृत हाेर्डींग काढून टाकण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी पाहणी सुरु केली. शंभराहून अधिक हाेर्डींगधारकांना नाेटीसा पाठविण्यात आली आहेत. त्यांना हाेर्डींगची दुरुस्ती करणे अथवा ते काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत ३० अनधिकृत हाेर्डींग काढून आहेत.
महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने गेल्यावर्षी देखील धाेकादायक हाेर्डींगबाबत कारवाई केली हाेती. हाेर्डींगच्या मालकांना स्ट्रक्चरल ऑडीट करून ताे दाखल करण्याचे आदेश दिले हाेते. परवानाधारक हाेर्डींग मालकांकडून ते दाखल केले गेले. परंतु २००हून अधिक हाेर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडीट दाखल झाले नाही. या हाेर्डींगबाबत प्रशासन काय भुमिका घेणार हे देखील पाहणे महत्वाचे आहे.
राजकीय हस्तक्षेप नकाे !
गेल्यावर्षी महापािलकेने अनधिकृत हाेर्डींगच्या विराेधात जाेरदार माेहीम हाती घेतली हाेती. दिड हजाराहून अधिक हाेर्डींग काढले गेल्याचा दावा प्रशासन करीत आहे. पुढे ही कारवाई थांबविली गेली. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्याच्या आदेशानंतर ही कारवाई शिथील गेली. या सत्ताधारी पक्षाच्या एका कार्यकर्त्याचे शहरात अनधिकृत हाेर्डींग असल्याची चर्चा आहे. सध्या प्रशासनाने पुन्हा अनधिकृत हाेर्डींग काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यावर पुन्हा एकदा राजकीय दबाव येऊ शकताे.
कुठे झाली कारवाई?
हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मगरपट्टा, मांजरी, मांजरी पाेस्ट अ|फीस, साेलापुर रस्ता येथील मास्क लाईन पब्लीसीटी, नितीन टाकले, प्रतिक जगताप, शरद नवले यांचे हाेर्डींग काढले गेले. नगर रस्ता – वडगांव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने खराडी, वाघाेली, पाेरवाल रस्ता, वडगाव शिंदे रस्ता (लाेहगांव ) येथील नऊ हाेर्डींग काढले गेले. ही हाेर्डींग गाैरव शर्मा, ओंकार सातव, दिपक कुलाळ, रणजीत सिंग, पप्पू अगरवाल यांच्या मालकीची हाेती. कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने शास्त्री रस्ता, बाजीराव रस्ता, दत्तवाडी पुल येथील एकुण तीन हाेर्डींग काढले. शिवाजीनगर घाेले राेड आणि औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने प्रत्येक एक हाेर्डींग काढले.
Web Title: Administration in pune active action taken on 30 hoardings so far nrdm