आढावा बैठकीत आमदार खताळांनी अधिकाऱ्याचे कान टोचले
Ahilyanagar News: जादूटोणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा! पोटे पती-पत्नीवर गुन्हा दाखल
आमदार खताळ म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिक एखाद्या विषयावर चार-पाच वेळा तक्रारी करत असतील तर त्या तक्रारींमध्ये नक्कीच तथ्य असते. अशा वेळी तातडीने सुधारणा करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कामे दर्जेदार झाली तर तक्रारी आपोआप कमी होतील. त्यामुळे प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सौजन्याने व संवेदनशीलतेने वागावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
जलजीवन मिशन आणि घरकुल योजना या अतिशय संवेदनशील योजना असून, काम सुरू असलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, असेही आ. खताळ यांनी सांगितले.
Ratnagiri News : मुंबई गोवा महामार्गावर होतोय मृत्यूचा सापळा; वाढत असलेल्या अपघातांना जबाबदार कोण?
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत चव्हाण, आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड, घरकुल विभागाच्या भाग्यश्री शेळके, ग्रामपाणीपुरवठा विभागाचे प्रदीप संवत्सरकर, उमेदचे ब्लॉक मॅनेजर निलेश कोकाटे, बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत, कृषी विभागाचे वाळीबा उघडे, स्वच्छता विभागाचे राजेंद्र कासार, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. पुंडलिक येवले, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संतोष दळवी यांनी आपापल्या विभागाचा आढावा सादर केला.
जलजीवन मिशन, घरकुल, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, उमेद आदी विभागांबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकामागोमाग एक तक्रारी मांडल्या. प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही गावात अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे आढळल्यास संबंधितांची नावे थेट माझ्यापर्यंत पोहोचवा, असे स्पष्ट निर्देश आ. खताळ यांनी दिले.
विकासकामांमध्ये ठेकेदारीपेक्षा अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने लक्ष घालावे. दर्जाहीन कामांचा फटका शासनाच्या प्रतिमेला बसतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.






